लोकसभेच्या तोंडावर BRSला धक्का! के. कविता यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी(court) अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांच्या जामीन अर्जावर राऊस ॲव्हेन्यू कोर्टात आज सुनावणी पार पडली. या सुनावण्यात कोर्टाने के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर बीआरएसला मोठा धक्का बसला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्ली मद्य घोटाळा(court) प्रकरणात बीआरएस नेत्या के. कविता सध्या ईडी कोठडीत आहेत. ४ एप्रिल रोजी कविता यांच्या जामीन अर्जावर दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टात सुनावणी पार पडली होती. सुनावणी पुर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता.

आज कोर्टाने याप्रकरणाचा निकाल दिला असून के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे कविता यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे ऐन लोकसभेच्या तोंडावर बीआरएसला मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, के. कविता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांची बाजू मांडली होती. ज्यामध्ये सिंधवी यांनी पीएमएलएचे कलम ४५ आणि महिलांना अपवाद असलेल्या तरतुदीचा उल्लेख केला होता. सिंघवी यांनी ‘मुल मांडीवर आहे किंवा लहान आहे असे नाही, ते 16 वर्षांचे आहे. पण इथे मुद्दा वेगळा आहे. हा आईचा तिच्या मुलासाठी नैतिक आणि भावनिक आधाराचा मुद्दा आहे. के. कविता यांच्या अटकेमुळे मुलावर आधीच मानसिक आघात झाल्याचा युक्तीवाद केला होता.

हेही वाचा :

तूरडाळीचे भावही भिडणार गगनाला; स्वयंपाकघराचे ‘बजेट’ कोलमडणार?

हळहळ: कोल्हापुरात फुटबॉल सामना पाहून घरी परतणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

आता मित्राचं रडकं स्टेट्स पण पाहावं लागणार; WhatsApp मध्ये येत आहे नवीन फीचर