२०१४ पासून मोदी लाट देशभरात पसरली, तेव्हापासून काँग्रेससह(ministers) देशातील इतर पक्षांना मोठी गळती लागली आहे. देशातील सर्वात जुना पक्ष २०१४ पासून सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. एकीकडे देशातून आणि अनेक राज्यामधून काँग्रेस पक्षाची सत्ता गेली. तर दुसरीकडे पक्षाला मोठी गळती लागली, अनेक बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली. या दरम्यान पक्षांमध्ये अतंर्गत कलह देखील निर्माण झाले.
अनेक राज्यांमध्ये बड्या नेत्यांनी काँग्रेसची(ministers) साथ सोडली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आत्तापर्यंत पक्षातील १२ मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडली आहे. यातील बहुतांश जण भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत किती माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडली ते जाणून घेऊया.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावर्षी १२ फेब्रुवारीला पक्ष सोडला होता आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचं वृत्त समोर आलं. पक्षांतर झाल्यानंतर भाजपने त्यांना महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. जनतेने अशोक चव्हाण यांना 1987 साली पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून दिले. 2014 मध्ये ते दुसऱ्यांदा लोकसभेचे खासदार झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते ४ वेळा आमदार आणि २ वेळा खासदार होते.
पंजाबच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये काँग्रेस सोडली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अमरिंदर सिंग यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते अरुण जेटली यांचा अमृतसरमधून एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता. 2017 मध्ये, काँग्रेसने पटियालाच्या महाराजांना मैदानात उतरवले आणि निकाल त्यांच्या बाजूने लागला. साडेचार वर्षांनंतर पंजाबच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आणि कॅप्टनला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवावी लागली.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी २०१६ मध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. विजय बहुगुणा यांनी उत्तराखंडमधील 8 माजी आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. विजय बहुगुणा यांनी जानेवारी २०१४ मध्ये राजीनामा दिला होता. मार्च 2012 ते जानेवारी 2014 पर्यंत त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.
एसएम कृष्णा हे १९९९ ते २००४ पर्यंत कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते. एसएम कृष्णा यांनी २०१७ मध्ये काँग्रेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. १९६८ मध्ये एसएम कृष्णा हे पहिल्यांदा संसद सदस्य झाले होते. त्यांना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव होता. १९९९ मध्ये त्यांनी काँग्रेसला कर्नाटकमध्ये जिंकवले होते.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी २०२३ मध्ये काँग्रेसची साथ सोडत आपला राजीनामा सादर केला. किरण कुमार रेड्डी हे अविभाजित आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री होते. रेड्डी यांनी यापूर्वी 2014 मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा निर्माण करण्याच्या तत्कालीन यूपीए सरकारच्या निर्णयावरून काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष जय समैक्य आंध्र पक्ष स्थापन केला होता, पण 2018 मध्ये ते काँग्रेसमध्ये परतले. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू एके काळी काँग्रेसचे नेते होते. डिसेंबर 2016 मध्ये, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (PPA) च्या 32 आमदारांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खांडू सरकार जुलै 2016 पासून सत्तेवर आहे. यापूर्वी हे सरकार काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली होते.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि गांधी परिवाराचे जवळचे मानले जाणारे गुलाम नबी आझाद ऑगस्ट २०२२ मध्ये काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसपासून फारकत घेत स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला आहे. यावेळी त्यांचा पक्ष लोकसभा निवडणूकही लढवत आहे. 2005 मध्ये ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री झाले.
2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरियो यांनी पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या ते भाजपमध्ये आहेत. याशिवाय अजित जोगी, एनडी तिवारी, रवी नाईक आणि दिगंबर कामत यांनीही पक्ष सोडला आहे.
हेही वाचा :
सुजय विखेंना जीवे मारण्याची धमकी; सभेतच लावली ऑडिओ क्लिप…
लोकसभेच्या तोंडावर BRSला धक्का! के. कविता यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
सिगरेट ओढताना व्हिडीओ काढल्याने संतापली तरुणी; मित्राच्या मदतीने केली तरुणाची हत्या