इलॉन मस्क पुन्हा गोत्यात! कोर्टाचे आदेश मानण्यास नकार

इलॉन मस्क आणि ‘एक्स’ (ट्विटर) हे कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी एक्सच्या(comply company) अधिकाऱ्यांनी ठराविक अकाउंट हटवण्यासाठी मोदी सरकार आपल्यावर दबाव आणत असल्याचं म्हटलं होतं. आता अशाच एका प्रकरणात इलॉन मस्कने ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाशी देखील पंगा घेतला आहे. यामुळे त्याला मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

ब्राझील उच्च न्यायालयाने इलॉन मस्कला(comply company) एक्सवरील काही पोस्ट आणि अकाउंट्स हटवण्यास सांगितले होते. मात्र, याला सपशेल नकार देत मस्कने कोर्टाची ऑर्डरच आपल्या अकाउंटवरुन पोस्ट करण्याची धमकी दिली. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अ‍ॅलेक्झँड्रे यांनी ब्राझीलचे नागरिक आणि संविधानाला दगा दिला आहे. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, किंवा त्यांना काढून टाकण्यात यावं अशी मागणी मस्कने केली.

“ब्राझीलच्या लोकांना हक्क आहे की त्यांना पारदर्शकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं. या न्यायाधीशांनी एक्सवर मोठा दंड ठोठावला आहे. तसंच, ब्राझीलमधील आमच्या कर्मचाऱ्यांना अटक करून, देशात एक्सची सेवा ठप्प करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आम्हाला ब्राझीलमध्ये मोठं नुकसान होणार आहे. कदाचित तिथलं ऑफिसही आम्हाला बंद करावं लागेल. मात्र, पैशांपेक्षा तत्व अधिक महत्त्वाचं आहे.” असं मस्कने म्हटलं आहे.

इलॉन मस्क पुन्हा गोत्यात! कोर्टाचे आदेश मानण्यास नकार

दरम्यान, इलॉन मस्क आणि ब्राझील सरकार यामधील तणाव वाढत असताना या देशात एक्सवर बंदी येईल अशी चिन्हं आहेत. यामुळे इलॉन मस्कने ब्राझीलमधील यूजर्सना व्हीपीएन वापरण्याचा सल्ला दिला आहे. व्हीपीएन वापरून एक्स कसं अ‍ॅक्सेस करता येईल याबाबत त्याने आपल्या एक्स हँडलवरुन माहिती दिली आहे.

ब्राझीलचे सॉलिसिटर जनरल जॉर्ज मेसिआस यांनी मस्कला चांगलंच धारेवर धरलं आहे. “आम्ही अशा समाजात राहू शकत नाही, जिथे बाहेरच्या देशात राहणाऱ्या अब्जाधीशांच्या हातात सोशल मीडियाचा कंट्रोल आहे. आणि हे अब्जाधीश कायद्याला न जुमानता उलट आमच्याच अधिकाऱ्यांना धमकी देत आहेत.” अशी पोस्ट जॉर्ज यांनी केली होती. ब्राझीलच्या उच्च न्यायालयाने मात्र याबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं.

हेही वाचा :

मोदींच्या मनासारखं झालं नाही तर ते सत्तेचा गैरवापर करतात; शरद पवारांची टीका

किती हा अहंकार.. रणबीर पापाराझींवर भडकताच नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

कोल्हापुरात मुश्रीफांना मोठा झटका; निष्ठावंताचा मंडलिकांच्या प्रचारास नकार, काँग्रेससोबत राहणार