मोदींच्या मनासारखं झालं नाही तर ते सत्तेचा गैरवापर करतात; शरद पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(the power) कोणी स्थापन केला? या पक्षाची निर्मिती कोणी केली? राष्ट्रवादी पक्ष आम्ही सर्वत्र पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आज जी काही धोरणं सांगितली जातात ती समाजाच्या हिताची नाहीत. भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही हा निर्णय आम्ही घेतला आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

शरद पवार हे आज बारामती दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. बारामती(the power) तालुक्यातील सुपा येथे शरद पवारांनी कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावलीये. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवारांनी भाजपवर देखील टीका केलीये.

आमचं सरकार असताना आम्ही चारा छावण्या सुरू केल्या. मी स्वतः चारा छावणीला भेट द्यायला आलो होतो. मोदी सरकारने कांदा निर्यातीला बंदी घातली त्यामुळे कांद्याचे दर घसरलेत. काही भागात सोयाबीनचे पीक घेतले जाते. मात्र सोयाबीनच्या किंमती खाली आल्यात. उत्पादनाचा खर्च कमी होत नाही मात्र ज्यांनी पीक पिकवलं त्या पिकाची किंमत कमी होतं आहे,मोदी सरकारवर टीका करताना पवारांनी शेतकऱ्यांची सद्य परिस्थिती येथे सांगितली आहे.

मतदानाचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. निवडणुकीच्या प्रत्येक काळात तुम्हा लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळाला. मात्र यावेळी निवडणुकीत चित्र वेगळे आहे. आमचा संघर्ष हा भाजपशी आहे. आमच्यातून जे बाहेर गेले आहे त्यांच्याशी आमचा संघर्ष आहे, असंही शरद पवारांनी कार्यकर्त्यांना ठामपणे सांगितलं आहे.

भाजप म्हणजे तरुणांना नोकरीची चिंता वाढवणारा पक्ष आहे. आज त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. मोदींच्या मनासारखं झालं तर ठीक, मनासारखं झालं नाही तर ते सत्तेचा गैरवापर करतात. मोदींनी मला कळवलं मला बारामतीला यायचं आहे. त्यावेळी शरद पवार यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलोय. असं मोदींनी म्हटल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

मोदी यांच्या मनाविरुद्ध एखादं राज्य वागत असेल तर त्यांच्यावर ते कारवाई करतात. आज झारखंडचे मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल यांनी टीका केली म्हणून त्यांना आज जेलमध्ये टाकलंय. ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे, अशी भावना देखील शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

सांगलीतून लढण्यावर ठाम; संजय राऊतांवर थेट निशाणा… विशाल पाटील काय म्हणाले?

२०१४ च्या मोदी लाटेपासून १२ माजी मुख्यमंत्र्यांनी सोडला काँग्रेसचा हात

कोल्हापुरात मुश्रीफांना मोठा झटका; निष्ठावंताचा मंडलिकांच्या प्रचारास नकार, काँग्रेससोबत राहणार