महायुतीत सहभागी असणारे तिन्ही पक्ष म्हणजेच भाजपा , शिंदे गट आणि अजित पवार गट देवेंद्र फडणवीस चालवत(work from home) आहेत, असा आरोप शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. तसंच राज्यात 45 पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे नागपुरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी पोहोचले होते. राजू पारवेंच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे नागपुरात आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“आमचा सगळीकडे विजयच होणार आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान(work from home) करण्याची हमी देशवासियांनी दिली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माझे मित्र असून, सदिच्छा भेटीसाठी आलो आहे. ते स्वत: विदर्भात फार मेहनत करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील जागा महायुती लढत आहे. विदर्भातील वातावरण महायुतीमय झालं आहे. आज नरेंद्र मोदींची चंद्रपुरात सभा असून, परवा रामटेकला सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास आम्हाला आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही कामं नाही. देवेंद्र फडणवीस त्यांच्या भागात सभा घेत आहेत. जिथे बोलावलं जात आहे तिथे प्रचाराला जात आहेत. मी आणि अजित पवारही वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करत आहेत. विरोधकांना काम नसल्याने ते पिसं काढत आहेत”.
“आमच्या महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. महायुत्ती भक्कम आहे आणि मजबुतीने काम करत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जात आहोत. 50 ते 60 वर्ष जे झालं नाही ते मोदींनी 10 वर्षात केलं आहे. काँग्रेसने खरं तर 50 ते 60 वर्षांचा हिशोब दिला पाहिजे. महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार काम करत आहे. आम्ही अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. शेतकरी, कष्टकरी अशा सर्व वर्गातील लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही काम केलं आहे. जनता याची पोचपावती या निवडणुकीत देईल याची आम्हाला खात्री आहे,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
रामटेक प्रतीअयोध्या आहे. नितीन गडकरींच्या रॅलीत होतो. सगळीकडे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करुन नरंद्र मोदींचे हात बळकट करणं हा एकच सूर दिसत आहे. राज्यातून 45 पेक्षा अधिक जागा निवडून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना निवडून आणण्याचा निर्णय सर्वांना घेतली आहे.
हेही वाचा :
कट्टर हिंदू कधीच बीफ खात नाही, कंगना रोखठोक बोलली; पोस्ट व्हायरल
‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत…’ अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीचा दावा
बायकोच्या रीलवर नेटकऱ्यांची अश्लिल कमेंट, सरकारी कर्मचाऱ्याने लाइव्ह करत उचललं टोकाचं पाऊल