इचलकरंजीतील कुख्यात ‘केसरी गँग’चे तिघे गुंड जिल्ह्यातून हद्दपार

कोल्हापूर प्रतिनिधी : दरोडा, जबरी जोरी, हाणामारी, दहशत माजवणे(district 11) आणि खूनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या इचलकरंजीतील कुख्यात केसरी गँगने हातकणंगले तालुक्यात आपली दहशत निर्माण केली होती. आगामी लोकसभा निवडणूका शांततेत पार पडावा. यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने केसरी गँगच्या तिघां गुंडांना १ वर्षासाठी जिल्हयातून हद्दपार केले आहे.

टोळीप्रमुख राहुल शिवाजी केसरी (रा. आसरानगर, गल्ली नंबर १ इचलकरंजी), अमोल उर्फ रविंद्र शिवाजी कमते (रा. आसरानगर),चंद्रकांत बाबू आळेकट्टी (रा. आसरानगर, इचलकरंजी) अशी हद्दपार(district 11) केलेल्या तिघांची नावे आहेत. हद्दपार केल्यानंतर जर ते कोल्हापूर जिल्ह्यात कुठे दिसले तरी नागरीकांनी पोलीसांना कळवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी केले आहे.

केसरी गँगने इचलकरंजी शहरासह हातकणंगले तालुक्यात दहशत निर्माण केली होती. त्यांच्या या कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरीकांच्या मनता भितीदायक वातावरण होते. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या टोळीकडून जिल्ह्यात गुन्हे करून मतदारांना भिती दाखवण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या टोळीतील तिघांना तातडीने हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीसांनी प्रांताधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता.

हद्दपारीच्या निर्णयावर सुनावणी सुरु असताना केसरी गँगचा म्होरक्या राहुल केसरी याला म्हणणे मांडण्याची मुभा दिली होती.

मात्र गेल्या काही वर्षातील या टोळीवरील गुन्हे त्यांनी निर्माण केलेली दहशत पाहून टोळीतील राहुल केसरी,अमोल कमते आणि चंद्रकांत आळेकट्टी या तिघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. ते ज्या जिल्ह्यात राहतील तेथील पोलीस ठाण्यात हजेरी देण्याचे बंधन घातले आहे.

हेही वाचा :

देवेंद्र फडणवीसच तिन्ही पक्ष चालवतात? CM एकनाथ शिंदे म्हणाले ‘दुसरं काही काम….’

बायकोच्या रीलवर नेटकऱ्यांची अश्लिल कमेंट, सरकारी कर्मचाऱ्याने लाइव्ह करत उचललं टोकाचं पाऊल

‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत…’ अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीचा दावा