महाविकास आघाडीने गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत लोकसभेच्या जागावाटपाचा(teams meeting) फॉर्म्युला जाहीर केला. या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट महाविकास आघाडीकडून सर्वाधिक २१ जागांवर लढणार आहे. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा तिढा मिटल्याचे जाहीर करत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीने आज मंगळवारी पत्रकार(teams meeting) परिषदेचे आयोजन केलं. महाविकास आघाडीने या पत्रकार परिषदेत लोकसभेचा जागावाटपचा २१-१७-१० असा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानंतर या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या चंद्रपूरमधील सभेवरून उद्धव ठाकरेंनी तिखट शब्दात भाजपवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘काल तीन गोष्टींचा एकत्रित योग होता. सूर्यग्रहण, अमावस्या आणि यांची सभा होती. सर्व काही विचित्र होतं. कालचं भाषण हे कमळाबाईचे भाषण होतं. खरंतर ते पंतप्रधान यांचं भाषण नव्हतं. हे भेकड पक्षाचे नेते मोदी यांचं भाषण होतं. आम्ही पंतप्रधानपदाचा अवमान करणार नाही. आम्हाला नकली शिवसेना म्हणाले. त्यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे’.
‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा, असा भाजप पक्ष झाला आहे. जेव्हा शिवसेना निर्माण झाली, तेव्हा ते मोदी हिमालयात असतील. यांचा भाजप पक्ष खंडणीखोर आहे. चंदा दो धंदा लो.. असा यांचं काम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोटांगण घालायला आले होते. तुम्हाला विसर पडला असेल पण जनतेला पडणार नाही. खंडणीखोर पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला नकली शिवसेना म्हणायचं नाही, अशी टीका ठाकरेंनी केली.
हेही वाचा :
शाहरुख खान याच्या मुलासोबत ऐश्वर्याची लेक आराध्याचं लग्न? फोटो पाहून संतापले चाहते.
महाविकास आघाडीचं ठरलं! जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर; सांगलीत कोण?
खंडणी द्या, अन्यथा किडनी विकू; अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू