ग्राहकांना मोठा धक्का! आईस्क्रीम, केक आणि चॉकलेट होणार महाग

तुम्हाला चॉकलेट खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी(ice cream) ही महत्त्वाची बातमी आहे. आता चॉकलेट महागणार आहे. कारण चॉकलेट बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोको बीन्सच्या किमती वाढणार आहेत, त्यामुळे चॉकलेटच्या किमती वाढू शकतात. भारतात कोको बीन्सची किंमत सुमारे 150-250 रुपये प्रति किलो आहे जी 800 रुपयांपर्यंत वाढली आहे.

केवळ चॉकलेट निर्मातेच नव्हे तर अमूल, आइस्क्रीम(ice cream) ब्रँड बास्किन रॉबिन्स आणि अगदी स्नॅक निर्माते आणि इतर कंपन्यांवरही कोकोच्या वाढत्या किमतींचा परिणाम होणार आहे. अमूल ब्रँडचे मालक असलेल्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे एमडी जयेन मेहता यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, अमूल आपल्या चॉकलेट्सच्या किमती 10 ते 20% ने वाढविण्याचा विचार करत आहे.

एमडी जयेन मेहता म्हणाले, “भारतात एक किलो कोको बीन्सची किंमत 150 रुपयांवरून 250 ते 800 रुपयांपर्यंत वाढली आहे. आमच्याकडे डार्क चॉकलेटचा बाजारातील सर्वात मोठा हिस्सा आहे” अमूलने सध्या आईस्क्रीम आणि शीतपेयांच्या किमती कायम ठेवल्या आहेत आणि चॉकलेटच्या वाढत्या किमतीमुळे त्याचा बाजारातील हिस्सा कमी होईल असे वाटत नाही. “आईस्क्रीमसारख्या हंगामी उत्पादनाच्या किमती वाढवणे सोपे नाही,” मेहता म्हणाले.

अमेरिकन आइस्क्रीम ब्रँड बास्किन रॉबिन्सलाही कोकोच्या किमती वाढल्याचा फटका बसला आहे. भारतातील बास्किन रॉबिन्सचे मास्टर फ्रँचायझी अधिकार असलेले ग्रॅव्हिस फूड्सचे सीईओ मोहित खट्टर म्हणाले की, अनेक कोको-आधारित उत्पादनांच्या किमती पूर्वीच्या तुलनेत 70-80% वाढल्या आहेत. आम्ही हंगाम संपल्यानंतर परिस्थितीचे पुन्हा मूल्यांकन करू आणि पुढील कारवाईचा निर्णय घेऊ, आम्हाला या उन्हाळ्यात अजूनही चांगल्या विक्रीची अपेक्षा आहे.

हॅवमोर आइस्क्रीमने वर्षाच्या सुरुवातीलाच किमतीत किरकोळ वाढ केली आहे. हॅवमोरच्या व्यवस्थापकीय संचालक कोमल आनंद यांनी सांगितले की, किमतीत वाढ हा शेवटचा उपाय आहे. कोकोच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी करण्यासाठी आम्ही इतर मार्ग शोधू.

अमेरिकन आइस्क्रीम ब्रँड बास्किन रॉबिन्स देखील त्याच्या किमती कायम ठेवण्याचा विचार करत आहे. याशिवाय सध्याच्या किमती स्थिर ठेवण्याचे हॅवमोरचे उद्दिष्ट आहे. अहवालानुसार, अमूलचे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन चॉकलेटच्या किमतीत 10-20% वाढ करण्याचा विचार करत आहे.

अमूल सध्या आपल्या आईस्क्रीमच्या किमतीत कोणतेही बदल करत नसले तरी चॉकलेटच्या वाढलेल्या किमतींचा बाजारातील शेअरवर नकारात्मक परिणाम होणार नाही अशी आशा आहे.

हेही वाचा :

सूर्यग्रहण, अमावस्या आणि नरेंद्र मोदींची सभा; उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

खंडणी द्या, अन्यथा किडनी विकू; अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

शाहरुख खान याच्या मुलासोबत ऐश्वर्याची लेक आराध्याचं लग्न? फोटो पाहून संतापले चाहते