गिरगाव प्रीमियर लीग मोरया इलेव्हनने जिंकली

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक(ball) सामन्यात मोरया इलेव्हनने रुद्र इलेव्हनचा पराभव करत गिरगाव प्रीमियर लीगच्या जेतेपदावर आपले नाव कोरले.

दक्षिण मुंबईचे माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा व्हिजनचे अध्यक्ष, युवासेना सचिव प्रथमेश सकपाळ आणि गिरगाव बॉइज पुरस्कृत या गिरगाव प्रीमियर लीग स्पर्धेत एकापेक्षा एक अशा 16 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीच्या लढतीत रुद्र इलेव्हनच्या 67 धावांचा(ball) पाठलाग करताना मोरया इलेव्हनने त्यांना अटीतटीची झुंज दिली. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना मोरया इलेव्हनच्या अजिंक्य बेलोसेने उंच फटका मारला, तो सोप्पा झेल होता पण क्षेत्ररक्षकाकडून सुटला आणि अजिंक्यने दोन धावा घेत संघाला थरारक विजय मिळवून दिला. उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार अजिंक्यनेच पटकावला. तसेच अमन चौरसिया (गोलंदाज) आणि अंकित सिंग (मालिकावीर) या रुद्र इलेव्हनच्या खेळाडूंनीही पुरस्कार जिंकले. मोरयाचा प्रणय राणा उदयोन्मुख खेळाडू ठरला.

या दिमाखदार स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त दिनेश लाड, इस्लाम जिमखान्याचे युसूफ अब्राहनी, माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी दीपक शिंदे, उदय बने, छोटू देसाई, अभय हडप, सुरेश साळुंखे, जर्नादन बोत्रे, हेमंत तुपे, राजा सावंत उपस्थित होते.

या स्पर्धेदरम्यान शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, विभाग प्रमुख संतोष शिंदे, उपनेते अरुण दुधवडकर, दक्षिण मुंबई समन्वयक सुधीर साळवी, युवा सेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, समन्वयक मुकेश कोळी, अल्पेश मेस्त्री, माजी नगरसेवक गणेश सानप आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

सांगलीतून विशाल की चंद्रहार पाटील? तडजोडीस उद्धव ठाकरेंचा नकार, ‘मविआ’कडून आज घोषणा

मनोरंजन जोरदार, तुम्ही आहात का तय्यार ? एअरटेल एक्स्ट्रीम फायबरसोबत मिळेल शानदार एंटरटेनमेंट

२०२२ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय, २ वर्षांनंतर घटस्फोटाचा अर्ज! धनुष- ऐश्वर्याबाबत मोठी अपडेट