कोल्हापूरात बनावट नोटा छापून बाजारात आणणाऱ्या सात जणांना अटक

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रिंटर, कागद, लॅपटॉप वाहने जप्त, अटकेतील संशयीत(dtf printer) उच्च शिक्षीत. चैन करण्यासाठी बनावट नोटा छापून त्या बाजारात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या उच्चशिक्षीत सात जणांना शाहूपुरी पोलीसांनी शिताफीने अटक केली. एका तरुणाने आपल्या मित्रांच्या सांगण्यावरून बनावट नोटा बॅँकेत भरल्या होत्या. या गुन्हयाचा तपास करताना पाोलीसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला. अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी पत्रकारांना दिली.

पोलीसांनी कसून तपास(dtf printer) करून कोल्हापूर, कराड आणि पुणे येथील सात जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून नोटा छापण्यासाठी वापरलेला प्रिंटर, कागद, लॅपटॉप, वाहने असे साहित्य जप्त केले. कोल्हापुरातील ताराराणी चौकातील एका खासगी सावकाराच्या मुलाचाही यात समावेश आहे. यातील दोघे सिव्हिल इंजिनिअर आहेत. एकाने बीटेक केले आहे. एक बीबीएच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. नोटांचे डिझायनिंग आणि छपाई करणारा रोहित याने कमर्शियल आर्टचे शिक्षण घेतले आहे. तर अजिंक्य हा कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेत आहे.

या प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये रोहन तुळशीराम सूर्यवंशी (वय २४, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर), कुंदन प्रवीण पुजारी (वय २३, रा. विचारे माळ, कोल्हापूर), ऋषिकेश गणेश पास्ते (वय २३, रा. गंगावेश, कोल्हापूर), अजिंक्य युवराज चव्हाण (वय २६, रा. कळाशी, ता. इंदापूर, जि. पुणे), केतन जयवंत थोरात-पाटील (वय ३०, सध्या रा. पिंपरी, पुणे, मूळ रा. ओंड, ता. कराड, जि. सातारा), रोहित तुषार मुळे (वय ३३, रा. मलकापूर, ता. कराड) आणि आकाश राजेंद्र पाटील (वय २०, सध्या रा. पिंपरी, पुणे, मूळ रा. काले, ता. कराड) यांचा समावेश आहे.

२८ मार्च रोजी राजारामपुरी येथील एका एटीएम सेंटरच्या डिपॉझिट मशीनमध्ये ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा जमा झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन बनावट नोटा जमा झालेले खाते नवी मुंबईतील एका व्यक्तीचे असल्याचे शोधून काढले. मात्र, कोल्हापुरातील मित्राने त्याच्या खात्यावर पैसे जमा केले होते.

डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. या बनावट नोटा पुणे आणि कराड येथील तरुणांकडून मिळाल्याचे समजताच पोलिसांनी छापेमारी करून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील प्रिंटर, कागद, लॅपटॉप, कटर आणि काही बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सातही जणांची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.

असा झाला उलघडा…

यातील रोहन सुर्यवंशी हा कर्जबाजारी झाला होता. त्याला पैशाची गरज होती. इंदापुरातील मित्र अजिंक्य चव्हाण याने त्याला बनावट नोटा घेऊन कर्जाची परतफेड कर अशी युक्ती सुचवली. त्यासाठी त्याने पुण्यातील केतन थोरात-पाटील याचा मोबाइल नंबर दिला. बनावट नोटा आणण्यासाठी रोहनने पुजारी आणि पास्ते यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने पुण्यात जाऊन केतन याच्याकडून दहा हजारांच्या बदल्यात २५ हजारांच्या बनावट नोटा आणल्या. त्यातील प्रत्येकी १२ हजार रुपये पुजारी आणि पास्ते यांना दिले. स्वत:कडे ठेवलेले एक हजार रुपये खर्च केले.

पास्ते याने दहा हजाराच्या बनावट नोटांसह एकूण ५० हजार रुपये दरमहा १४ टक्के व्याजाने एका व्यक्तीला दिले. ते पैसे डिपॉझिट मशीनमध्ये भरल्यानंतर बनावट नोटांचा प्रकार समोर आला.

पोलिसांच्या तपासात बनावट नोटांची मागणी करणाऱ्यांपासून ते पोहोचवणारी साखळी उलगडली. डिपॉझिट मशीनमध्ये नोटा भरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी या गुन्ह्यात साक्षीदार बनवले आहे. त्याला बनावट नोटांची काहीच कल्पना नव्हती,अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

हेही वाचा :

क्रिकेटच्या महाकुंभाचा बिगुल वाजला; ‘या’ आठ ठिकाणी रंगणार वर्ल्ड कपचा थरार

पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागातील हवामान बिघडणार

मंडलिकांच्या एका सवयीवर अंबरीश घाटगेंची 10 हजारांची पैज