विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे आगामी टी 20 वर्ल्डकपमध्ये(t20 world cup) भारताकडून सलामीला उतरण्याची शक्यता आहे. बीसीसीआय आणि निवडसमितीने देखील अजून हा विचार पूर्णपणे फेटाळलेला नाही. यामुळे संघातील समतोल साधण्यास देखील मदत होणार आहे.
विराट कोहलीने 2024 च्या आयपीएलमध्ये धडाकेबाज सुरूवात केली आहे. त्याने या कामगिरीद्वारे आगामी टी 20 वर्ल्डकपसाठीच्या(t20 world cup) भारतीय संघात आपली दावेदारी ठोकली. विराट कोहली सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. प्रश्न फक्त वर्ल्डकपमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी सलामीला यावं का हा आहे. बीसीसीआय आणि निवडसमितीने याबाबत विचार करणं अजून बंद केलेलं नाही.
दोन जूनपासून टी 20 वर्ल्डकप सुरू होत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. सलामीवीर म्हणून रोहित शर्मानं आपली जागा पक्की केली आहे. आता दुसरा सलामीवीर म्हणून विराट कोहलीची देखील चर्चा सुरू आहे. विराट कोहलीच्या फलंदाजीच्या क्रमवारीबाबत देखील विचार सुरू आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने इनसाईड वेबसाईटला सांगितले की, ‘नक्कीच एक सलामीवीर म्हणून विराट कोहलीबाबत नक्कीच चर्चा होऊ शकते. जर संघाला अशा कॉम्बिनेशनमध्ये अजून एका खेळाडूला संधी देण्यास मदत होत असेल तर विराटला सलामीला का खेळवलं जाऊ शकत नाही? बॅटिंगच्या स्थानाबाबत विराट कोहली अडून बसत नाही.
तो सातत्याने आयपीएलमध्ये आपल्या फ्रेंचायजीकडून सलामीला खेळत आला आहे. त्यामुळे तो सलामीला कसा खेळले हा प्रश्नच नाहीये. आता हा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यायचा आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये आरसीबीकडून 103 सामन्यात सलामी दिली आहे. त्याने 45.66 च्या सरासरी आणि 136.26 च्या स्ट्राईक रेटने एकूण 3927 धावा केल्या आहेत. याचबरोबर विराट कोहलीने आठ आयपीएल शतके देखील ठोकली आहेत.
आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 9 सामन्यात सलामी दिली असून त्याने 57.14 च्या सरासरी अन् 161.29 च्या स्ट्राईक रेटने 400 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक देखील आहे.
हेही वाचा :
विराट कोहलीने भर मैदानात सर्वांसमोर का धरले कान Video Viral
पंकजा मुंडेंचं टेन्शन वाढलं; ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार बीड लोकसभेच्या रिंगणात
हातकणंगलेत तीन अपक्ष आमदारांची बंद खोलीत चर्चा; कोरे-आवाडे- यड्रावकरांचं काय ठरलं