महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि भाजप नेते खासदार(irdai complaint) धनंजय महाडिक यांची वक्तव्य महाविकास आघाडीतील नेत्यांना झोंबली आहेत. खासदार मंडलिक यांचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल तर महाडिक यांचे 5 कोटी रुपयांचा निधीची घोषणा, ही विधानं त्याला कारणीभूत ठरली. शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे महाविकास आघाडीनं तक्रार दाखल केली आहे.
काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती(irdai complaint) यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाकपचे शहर सचिव रघुनाथ कांबळे यांनी तर महाडिक यांच्या वक्तव्याच्या विरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
एका प्रचारार्थ मेळाव्यात बोलताना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मंडलिकांना मताधिक्य देणाऱ्या तालुक्याला पाच कोटी विकास निधी देण्याची घोषणा केली होती. महाडिकांची घोषणा लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 123 मध्ये ‘लाचलुचपत’ या शब्दाची व्याख्या दिली आहे. त्या व्याख्येमध्ये तंतोतंत समाविष्ठ होत असल्याचे निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
नेसरी (गडहिंग्लज) येथील सभेत खासदार मंडलिकांनी ‘आत्ताचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार नाहीत. ते कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत,’ असे वक्तव्य केले होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम तसेच कोल्हापूर संस्थानच्या दत्तक संबधिच्या कायद्यान्वये, कायदेशीरदृष्ट्या कोल्हापूर संस्थानामध्ये दत्तक आले आहेत. भारतातील प्रचलित कायद्याप्रमाणे दत्तक मुलाच्या पोटी जन्मलेल्या मुलाप्रमाणे स्थान दिले आहे. त्यामुळे शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूर संस्थानचे खरे वारस आहेत.
मंडलिक हे देशाच्या सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेचे सभासद आहेत. या सभागृहाला कायदेमंडळ सुद्धा म्हटले जाते. ज्या सभागृहात साधक बाधक चर्चा केल्यानंतर कायदे तयार केले जातात. अशा सभागृहाचे सभासद व पेशाने प्राध्यापक असलेल्या खासदार मंडलिक यांनी धांदात खोटी, जनतेची व समाजाची दिशाभूल करणारी वक्तव्ये केल्याने सामाजिक उपद्रव निर्माण होण्याची शक्यता आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी शांतता भंग घडविण्याच्या उद्देशाने खोटी व चुकीचे विधाने केली आहेत. शाहू महाराज छत्रपतींच्याबद्दल जनतेच्या मनात चांगली भावना असताना त्यांची प्रतिमा मलिन करण्याची कृती खासदार मंडलिकांनी केली असल्याने त्यांच्यावर त्वरीत फौजदारी गुन्हा दाखल कराव, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा :
मुख्यमंत्री शिंदे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर; राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता!
टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट अन् रोहित करणार ओपन; निवडसमिती अन् बीसीसीआनेही…