इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत रविवारी (१४ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स(csk) संघात सामना होणार आहे. हा बहुप्रतिक्षित सामना वानखेडे स्टेडियमवर होणार असून या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
आयपीएलमधील हे दोन्ही संघ सर्वात यशस्वी संघ असून कट्टर प्रतिस्पर्धीही समजले जातात. या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्स(csk) संघ मुंबईत पोहचला असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सला सध्या भारतभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे, यामागचे कारण म्हणजे एमएस धोनी.
सध्या अशी चर्चा आहे की धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम आहे. त्यामुळे त्याला चाहत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात स्टेडियममध्ये प्रेक्षकांकडून चिअर केले जात आहे. चाहते त्याची एक झलक पाहाण्यासाठीही उत्सुक आहे.
धोनीची ही लोकप्रियता मुंबईतही दिसून आली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाला मुंबईतही मोठा पाठिंबा मिळाला असून सध्या एक व्हिडिओही चर्चेत आहे.
हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला असून यामध्ये संघातील खेळाडू बसमधून वानखेडे स्टेडियमवर जात असताना दिसत आहे. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी दिसत असून चाहते खेळाडूंची एक झलक टिपण्यासाठी उत्सुक दिसत आहेत.
हेही वाचा :
लोकसभा निवडणूक, आणि शिवसेनेचे आयात उमेदवार!
सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु
‘तुझी आईच माझी सासू बनणार’; VIDEO शेअर करत मानसी नाईकनं दिली हिंट!