‘तुझी आईच माझी सासू बनणार’; VIDEO शेअर करत मानसी नाईकनं दिली हिंट!

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक(sharing video) हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मानसी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती सतत काहीना काही पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच मानसीनं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याचं कारण म्हणजे यावेळी तिनं तिच्या होणाऱ्या सासूचा उल्लेख केला आहे.

मानसीनं तिच्या इन्स्टाग्राम(sharing video) अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओत मानसीनं मझेंटा रंगाची साडी नेसली आहे. मानसीचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर स्पर्श झाला या गाण्यावर डान्स करताना मानसी दिसते. हा व्हिडीओ शेअर करत मानसीनं कॅप्शन दिलं आहे की ‘”काही पण झालं ना तरी पण तुझी आईच माझी सासू बनणार…” मानसीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

मानसीचा व्हिडीओ पाहताच एक नेटकरी म्हणाला, “सर्व गुण संपन्न असलेले व्यक्तिमत्व… लावण्यासुंदरी.” दुसरा नेटकरी म्हणाला, “हिरा आहेस ताई तू… राणी आहेस पण ज्याला तू दिसली नाही तो आंधळा होता.” तिसरा नेटकरी म्हणाला की “तुझं सारी कलेक्शन मला खूप आवडतंय.” आणखी एक नेटकरी म्हणाला की “स्वर्ग अप्सरा आहेस तू, लय भारी ताई.”

दुसरा नेटकरी म्हणाला, “तुझ्या अदांनी माझा जीव घेतेस की काय आता.” तिसरा नेटकरी म्हणाला, “सुंदरतेची राणी.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “गाणं ही सुंदर, तुझी साडीही सुंदर आणि तुझा डान्सही सुंदर.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तू इतकी सुंदर कशी आहेस.” तिसरा नेटकरी म्हणाला, “खूप छान दिसते आहेस लावण्याची खाणं जणू काही.”

मानसीविषयी बोलायचं झालं तर तिनं प्रदिप खरेरा सोबत 19 जानेवारी 2021 रोजी लग्न केलं होतं. लग्नाच्या काही महिन्यातच ते विभक्त झाले. त्यानंतर घटस्फोटावर मानसी अनेकदा स्पष्ट बोलताना दिसली. त्या आधी पासून बराच काळ ते रिलेशनशिपमध्ये होते. सोशल मीडियावर मानसी आणि प्रदिप अनेकदा फोटो शेअर करताना दिसायचे. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या दोन गाण्यांमुळे मानसीला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

हेही वाचा :

सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु

मोदींचा फोटो लावून प्रकाशअण्णा आवाडेंनी हातकणंगलेत महायुतीविरोधात ठोकला शड्डू!

लोकसभा निवडणूक, आणि शिवसेनेचे आयात उमेदवार!