राज्यात तापमानाचा पारा वाढणार, विदर्भ मराठवाड्यात पाऊस कोसणार;

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील (heat)हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कुठे अवकाळी पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट आली आहे. बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. अवकाळी पाऊस अन् उष्णतेचा कहर कधी संपणार याची वाट अनेकजण पाहत आहेत. अशातच हवामान खात्याने अवकाळी पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

येत्या २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस (heat) होणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर काही भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके झाकून ठेवावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. उत्तर गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती अद्याप कायम असल्याने वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. उत्तर ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय.

त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पाऊस कोसळत आहे. दरम्यान, हवामान खात्याने मंगळवार आणि बुधवारी मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

दुसरीकडे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात सोमवारी विक्रमी तापमान नोंदवले गेले आहे. मंगळवारी (ता. १६) उत्तर कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं, असा सल्ला देण्यात आलाय.

हेही वाचा :

धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! 

मंडलिक,माने यांचे शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल करणार

लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के यशासाठी अजित पवार यांची सर्वात मोठी रणनीती