सांगली लोकसभा मतदारसंघात जोरदार राजकीय(front loaded) घमासान घडून येत आहे. एकिकडे ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती. तर दुसरीकडे नाराज झालेले काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच येथून वेगळ्या चिन्हावर काँग्रेसचाच खासदार निवडून येणार असल्याची वल्गना करत विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीपुढे आव्हान निर्माण केले आहे. यामुळे आता सांगलीत ठाकरेंपुढे बंडखोरीची डोकेदुखी निर्माण झाली आहे.
बंडखोरीच्या(front loaded) तयारीत असलेले नाराज विशाल पाटील म्हणाले, “शिवसेना म्हणते आनंच चिन्ह चोरुन नेलं, राष्ट्रवादीही म्हणते आमचं चिन्ह नेलं. सांगलीकरांचंही तेच भांडण आहे. काँग्रेसचं चिन्ह तुम्ही नेऊ पाहताय. तुम्ही आम्हाला चिन्ह दिलं नाही, पण वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी काँग्रेसचाच खासदार निवडून येणार, अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. आता माघार घ्यायची ती महाविकास आघाडीने घ्यायची आहे. आणि 19 तारखेपर्यंत एबी फॅार्म आमच्या उमेदवारी अर्जाला जोडावा, असा खुला इशाराच विशाल पाटील यांनी केला.
विशाल पाटलांच्या या बंडखोरीवर उद्धव ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतला आहे. “महाविकास आघाडीचं जागावाटप आता झालेलं आहे. आघाडीतल्या तिनही पक्षांनी, सर्व मित्रपक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केलेलं आहे. जर आता बंडेखोरी आणि गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षांची जबाबदारी आहे की, ही बंडखोरी थांबवलं पाहिजे. पण मला नाही वाटत आता बंडखोरी झाली तर जनता त्याला स्थान देईल,” असे ठाकरे म्हणाले.
“लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कुणीही निवडणुका लढवू शकतो. विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. माजी मुख्यमंत्री वसंदादा पाटलांचे नातू आहेत. ज्यांनी कधीच काँग्रेसशी बेईमानी केली नव्हती. उमेदवारी हा वेगळा विषय आहे. त्यामुळे काँग्रेसशी जी परंपरा आहे, त्या पंरपरेला तोडून ते वेगळी भूमिका घेणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा :
कोल्हापुरात खळबळ; महायुतीची साथ सोडताच ए. वाय. पाटलांवर गुन्हा दाखल
राज ठाकरेंकडून मुलांच्या शाळेबाबत सरकारकडे महत्त्वाची मागणी