कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार(current political news) संजय मंडलिक यांनी काल सकाळ कार्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील जुना विषय काढून पुन्हा एकदा वादाला उकळी दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार संजय मंडलिक, हे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात होते. पण राजकीय घडामोडीमुळे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आघाडी धर्म फाट्यावर मारून संजय मंडलिक यांच्या विजयासाठी प्रयत्न केला होता. तोच विषय म्हटले की यांनी पुढे करून जुन्या वादाला नवी उकळी दिली आहे.
सध्या संजय मंडलिक आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक(current political news) हे महायुतीत आहेत. लोकसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत आमचा फार दोस्ताना होता असे नाही. त्यांना कोणाला तरी पराभूत करायचे होते. त्यामुळे ते माझ्याकडे आले होते, मी त्यांच्याकडे गेलो नाही’, असा टोला महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला.
२०१९ च्या निवडणुकीत त्यांची राजकीय गरज होती. त्यामुळे ते मला मदत करायला आले. मी त्यांच्याकडे काही ठरवायला गेलो नव्हतो. यामध्ये आमचा फार दोस्ताना होता असे नाही तर, त्यांना कोणाला तरी पराभूत करायचे होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत मी शिवसेना आणि भाजपचा उमेदवार होतो. त्यामुळे आम्ही कोठे जावे हा विषय नव्हता, तर तेच आमच्याकडे आले होते, अशा शब्दांत मांडलिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
संपर्क नसल्याची टीका करणाऱ्यांवर बोलताना ते म्हणाले, ‘वर्षातून दोन-दोन महिन्यांची तीन अधिवेशने असतात. यामध्ये कामाचे अर्धे दिवस गेले. यातच कोरोना आला. तरीही आम्ही लोकांना भेटत होतो. संजय मंडलिक कुठे दिसत नाहीत, हे अलीकडच्या काळात कोणीतरी खोटा प्रचार करत आहेत.
मी कुठे दिसत नाही म्हणून कोल्हापूर जिल्हा बँकेला निवडून आलो का?, ‘गोकुळ’मध्ये पॅनेल कसे विजयी केले?, ‘दक्षिण’मध्ये ऋतुराज पाटील यांच्या प्रचारात कोण होते?, ‘बिद्री’ला संपूर्ण पॅनेल तयार केले, त्याला लोकांनी भरघोस मते दिली. त्यामुळे हे सर्व मी कोठे दिसत नाही म्हणून किंवा लोकांमध्ये जात नाही म्हणून दिले का?’ असा सवालही मंडलिक यांनी केला.
हेही वाचा :
काँग्रेसचा शेवटचा प्रयत्नही असफल; ‘उत्तर मुंबई’च्या बदल्यात ‘सांगली’चा प्रस्तावही ठाकरेंनी फेटाळला
पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली, तर शरद पवार पाठिंबा देतील : संजय राऊतांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील डझनभर नेते आमच्या पक्षात येणार; जयंत पाटलांचा दावा