कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी समोर (youth)आली आहे. कोल्हापूरच्या जवाहरनगर परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. टोळीयुद्धातून जवाहर नगरातील यादव कॉलनीमधील सरनाईक वसाहतीमध्ये काल रात्री ११ वाजता गोळीबार झाला. यामध्ये साद शौकत मुजावर (वय २३) हा गंभीर जखमी झाला.
त्याच्या मांडीत गोळी लागली आहे तसेच डोक्यावरही(youth) वार करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, साद मुजावर हा वाहने आणि जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. रात्री अकराच्या सुमारास तो त्याच्या मित्रांसोबत घराजवळील कट्ट्यावर बसला होता. तेवढ्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनातून पाच ते सहा तरुण तेथे आले. त्यांनी पिस्तूल साद याच्या दिशेने रोखून तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या मांडीत घुसली; तर दोन गोळ्या हवेत गेल्या.
यानंतर संशयितांपैकी दोघांनी त्याच्या डोक्यावर धारदार शास्त्राने वार केले. दरम्यान, परिसरातील लोक तेथे येताना दिसताच तरुणांनी वाहनांतून पळ काढला. जखमी सादला त्याच्या मित्रांनी दुचाकीवरून सीपीआरमध्ये आणले. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी भेट दिली. यावेळी दोन पुंगळ्या हस्तगत केल्या गेल्या.
घटनेची माहिती कळताच परिसरातील तरुण सीपीआरमध्ये पोहोचले. पोलिसांनी या गर्दीला पांगवले. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू आहे. अशावेळी घडलेल्या या गोळीबाराच्या प्रकारामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे.
साद याचे वडील शौकतअली मुजावर यांनी पाच संशोधकांची नावे सांगितली आहेत. यामध्ये सद्दाम मुल्ला, इमाम हुसेन कुरणे, माजी नगरसेवक सत्तार मुल्ला, मोहसीन मुल्ला, तौहिक कुरणे अशी त्यांची नावे आहेत.
हेही वाचा :
साखर सम्राटांच राजकारण आणि सा.रे. पाटलांचं बंड
उमेदवारी माघारीची चर्चा सुरु असतानाच सांगलीत विशाल पाटलांचा मोठा निर्णय!
एमआयएमचा पाठिंबा शाहू महाराजांना अडचणीचा ठरेल : राजेश क्षीरसागर