मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सला(csk) ६ विकेटनी हरवले. सीएसकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २१० धावा केल्या होत्या.
कर्णधार ऋतुराज गायकवाडने (csk)६० बॉलमध्ये १०८ धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली होती. दुसऱीकडे आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनऊ संघाची सुरूवात खराब राहिली.
क्विंटन डी कॉक आणि कर्णधार केएल राहुल १६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लखनऊकडून सर्वाधिक धावा मार्कस स्टॉयनिसने बनवल्या. या डावात स्टॉयनिसने १३ चौकार आणि ६ षटकार लगावले. तर शेवटच्या ओव्हरमध्ये दीपक हुड्डानेही ६ बॉलमध्ये १७ धावांची तुफानी खेळी करत लखनऊला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
११ षटके पूर्ण होईपर्यंत लखनऊ सुपर जायंट्स ८८ धावांवर ३ विकेट गमावून बसली होती. संघाला आता ९ षटकांत १२३ धावा हव्या होत्या. अशातच मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांच्यातील ७० धावांच्या भागीदारीने चेन्नईच्या चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली. मात्र १७व्या षटकांत मथीशा पथिराने पूरनला माघारी धाडले. निकोलस पूरनने १५ बॉलमध्ये ३४ धावा केल्या.
लखनऊला शेवटच्या ३ ओव्हरमध्ये ४७ धावा हव्या होत्या. १८व्या ओव्हरमध्ये त्यांनी १५ धावा केल्या. आता त्यांना १२ बॉलमध्ये ३१ धावा हव्या होत्या. १९व्या षटकांतही १५ धावा झाल्या. त्यानंतर शेवटच्या ६ बॉलमध्ये १७ धावा हव्या असतानना. शेवटच्या ओव्हरमधील दोन बॉलमध्येच १५ धावा झाल्या. यात एका नोबॉलचा समावेश होता. तर ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर स्टॉयनिसने चौकार ठोकत लखनऊचा विजय निश्चित केला.
हेही वाचा :
शिराळा पुन्हा राजू शेट्टींना भरभक्कम साथ देणार का?; ‘स्वाभिमानी’वरच सर्व भिस्त
सांगलीतील काँग्रेस नेते शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांच्या प्रचारात उतरणार का?
मी कसलेला पैलवान, माझ्या नादाला लागू नये; सतेज पाटीलांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम