PM मोदींसह आता राहुल गांधींनाही निवडणूक आयोगाची नोटीस, उत्तरे द्यावी लागणार!

नवी दिल्ली : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी(answers) पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यावर राहुल गांधी यांनी टीका केली.

तर काँग्रेसने मोदींच्या टीकेतील वक्तव्याविरोधात निवडणूक(answers) आयोगाकडे तक्रार नोंदवली. त्यांतर भाजपनेही राहुल गांधी यांच्या विरोधात आयोगाकडे तक्रार नोंदवली. या सर्व राजकीय घडामोडींवरून आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगाला उत्तरे द्यावी लागणार आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र यांनी एका समुदायाचा उल्लेख करत केलेल्या टिप्पणीवर काँग्रेस केंद्रीय आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर आयोगाने भाजपला नोटीस धाडली. त्यामुळे आता भाजपला २९ एप्रिलला ११ सकाळी वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे.

तर नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी यांच्या एका विधानावरून आयोगाने काँग्रेसला नोटीस धाडली आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना उत्तर द्यावे लागणार आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार केली. तर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने तक्रार केली होती.

हेही वाचा :

सांगलीत विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक

षटकार-चौकारांचा पाऊस पाडल्यानंतर ऋषभ पंतला मागावी लागली माफी!

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकांआधीच राज्यातील २१ साखर कारखान्यांना मिळाली कर्जाची गॅरंटी