मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा चाहता(poem) वर्ग मोठा आहे. संकर्षण हा नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. संकर्षण हा विविध विषयांवर कविता देखील लिहितो. तो कार्यक्रमांमध्ये त्या कविता सादर करतो. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित असणारी कविता देखील संकर्षणनं लिहिली आहे. ही कविता नुकतीच त्यानं एका कार्यक्रमात सादर केली.
संकर्षणनं एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संकर्षण हा राजकीय परिस्थितीवर आधारित असणारी त्यानं लिहिलेली कविता(poem) सादर करताना दिसत आहे.
संकर्षणनं लिहिलेली ही कविता एका कुटुंबावर आधारित होती. या कुटुंबातील आजोबांनी त्या कुटुंबातील सदस्यांची मतं वाया गेल्यानं दु:ख व्यक्त करत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं, असं या कवितेत मांडण्यात आलं आहे.
संकर्षणनं त्याच्या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “नमस्कार, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काही लिहिण्याचा मनापासून प्रयत्नं केला आणि प्रेक्षकांनी काल तो प्रयत्नं अगदी मनापासून स्विकारला… तुम्हीही ऐका , पहा आणि मनापासून सांगा की, तुमच्याही मनांत हेच आहे का?”
गेल्या वर्षी संकर्षणचा तीन अडकून सीताराम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. संकर्षणनं वेडिंग शिनेमा, खोपा, नागपूर अधिवेशन या चित्रपटात देखील काम केलं आहे. तसेच संकर्षणच्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
सध्या संकर्षण आणि अभिनेत्री स्पृहा जोशी हे त्यांच्या संकर्षण via स्पृहा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या कार्यक्रमात ते विविध गाणी आणि कविता सादर करत असतात.
हेही वाचा :
बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते म्हणाले तरी काय??
‘या’ वर्षी भाजप आरक्षण संपवणार! मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
‘… दिशाभूल करू नका’, संजय मंडलिकांचे शाहू महाराजांना खुल्या चर्चेचे आवाहन