शुक्रवारी मध्यरात्री कुकी कट्टरपंथीयांकडून केंद्रीय राखीव (north central)पोलीस दलावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.मणिपूरमधील हिंसाचाराचे चक्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशातच शुक्रवारी मध्यरात्री कुकी कट्टरपंथीयांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत.
याबाबत माहिती देताना मणिपूर पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री उशिरा ते मध्यरात्री २.१५ च्या दरम्यान कुकी कट्टरपंथीयांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (north central) दोन जवानांना आपला जीव गमवावा लागला. हे दोन्ही जवान मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील नरसेना भागात तैनात सीआरपीएफच्या १२८ व्या बटालियनचे होते.
हेही वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा तपोवन वर
मोठी बातमी! तब्बल ६ गावांचा मतदानावर बहिस्कार; काय आहे कारण?
कारवाईची सही करणाऱ्याने विचार करावा…, विशाल पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?