कोल्हापुरात लाठीकाठीवरून वातावरण तापलं

कोल्हापुरातील लाल मातीच्या मैदानात लाठी-काठीवरून राजकारण (atmosphere)तापलं आहे. काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांनी भर सभेतून महायुतीवर निशाणा साधला होता. प्रचार करताना आमच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला, तर बंटी पाटलांबरोबर गाठ आहे. निवडणुकीपर्यंत सतर्क राहा. काही अडचण आली, तर बंटी पाटील रात्री बारा वाजता काठी घेऊन उभा आहे, असा इशारा सतेज पाटलांनी महायुतीला दिला होता. यावर खासदार धनंजय महाडिक यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

“सतेज पाटील यांना या निवडणुकीत(atmosphere) पराभव दिसू लागला आहे. म्हणून त्यांची भाषा ‘माझ्याशी गाठ आहे’, ‘काठी घेऊन येईन’ अशी आहे. त्यांचा भाषेवरचा तोल गेला आहे,” असं म्हणत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना डिचवलं आहे.

“श्रीमंत शाहू महाराज यांच्या पाया कोण पडत नाही? आम्ही जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या पाया पडणार आहोत. सगळे कोल्हापूर त्यांच्या पाया पडते. त्याचे छायाचित्र व्हायरल केल्याने काय होणार आहे ? उलट मंडलिकांचा मान वाढणार आहे. महाराज सगळ्यांचे आदरस्थान आहेत,” असंही महाडिक म्हणाले.

“महाविकास आघाडीमध्ये काही दम राहिलेला नाही. ते नेहमी मान-सन्मानाच्या गोष्टी करतात. देशातील राजघराण्याचा सन्मान करण्याचे काम भाजपने केले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे खाते उघडले जाणार नाही, अशी स्थिती आहे,” असा दावाही महाडिक यांनी केला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणेने कोल्हापुरातील सर्व यंत्रणा हाती घेतली आहे. विमानतळ ते तपोवन मैदान हा सायबर रिंगरोडवर पोलिसांनी ताफ्याची रंगीत तालीम घेतली. सुमारे दीडशेहून अधिक अधिकारी या दौऱ्यासाठी दिवसरात्र नियोजनात आहेत. दिल्लीतील खास सुरक्षा यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे. सुमारे दीड लाख लोक उपस्थित राहतील, असा संयोजकांचा अंदाज आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवरांनी तपोवन मैदानाची पाहणी केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्याच्या सभेसाठी गर्दीचा महापूर येथे येईल. त्यांच्या भाषणानंतर कोल्हापूर आणि हातकणंगले येथील दोन्ही उमेदवार यापूर्वीपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतील,” असा विश्‍वास धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा :

पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी दिला : राजेश क्षीरसागर

कोल्हापूरच्या गादीपुढे मोदी कोणीही नाहीत; संजय राऊतांची घणाघाती टीका