कोल्हापूरच्या गादीपुढे मोदी कोणीही नाहीत; संजय राऊतांची घणाघाती टीका

कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात मोदींनी तंबू(throne)ठोकला आहे. लवकरच ते मुंबईत देखील सभा घेणार आहेत. छत्रपती शाहू महाराजांचा पराभव व्हावा यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल, अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात(throne) जाहीर सभा पार पडणार आहे. कोल्हापूरच्या तपोवन या मैदानावर आज सायंकाळी ५ वाजता ही सभा पार पडणारे. या सभेवरून संजय राऊतांवर जोरदार टीका करत थेट छत्रपती शाहू महाराजांचा पराभव व्हावा यासाठी मोदी येत असल्याचं वक्तव्य केलं आहे.

भाजपने कोल्हापुरात उमेदवार जाहीर करणंच चुकीच आहे. छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं ही आमची भूमिका होती. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली आणि भाजप, नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही, असं मत राऊतांनी यावेळी व्यक्त केलं.

गादी पुढे मोदी कोणीही नाहीत. कोल्हापूरची गादी, म्हणजे मोदींची गादी नाही. भाजपा त्या गादीचा अपमान करत आहे. आम्हाला अपेक्षित होतं मोदी छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात येतात, अशा शब्दांत राऊतांनी मोदींवर टीका केलीये.

जय भवानी जय शिवाजी ही घोषणा त्या गादीची आहे शिवाजी महाराजांचा सन्मान करणारी ही प्रेरणादायी घोषणा आम्ही देतो. महाराष्ट्राची ती कुलदैवत आहे त्यावर तुम्ही आघात करत आहात. शिवाजी महाराजांच्या गादीच्याविरोधात तुम्ही प्रचाराला आले आहात, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय.

हेही वाचा :

संजयकाका पाटलांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या स्वकियांची भाजपकडून गच्छंती

काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी दिला : राजेश क्षीरसागर

पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?