संजयकाका पाटलांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या स्वकियांची भाजपकडून गच्छंती

सांगली लाेकसभा मतदारसंघात भाजपने(political consulting firms) पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवत जत तालुका भाजप अध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. जत तालुका भाजप अध्यक्ष प्रमोद सावंत हे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यापर्यंत सावंत यांच्या तक्रारी गेल्या. त्यानंतर पाटील यांनी सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

भाजप नगरसेवक , नेत्यांचा विशाल पाटलांच्या(political consulting firms) प्रचारामध्ये वाढत्या सहभागामुळे भाजपची डोकेदुखी वाढल्याचे बाेलले जात आहे. दरम्यान या कारवाईवर बाेलताना प्रमाेद सावंत आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले.

त्यांनी भाजपच्या वेगवेगवेगळ्या मोर्चाचे अध्यक्ष व पदाधिकारी सामुदायिक राजीनामा देणार आहेत असे सांगितले. आधी माजीआमदार, त्यानंतर चार नगरसेवक आणि आता तालुका अध्यक्ष संजयकाका पाटलांच्या विरोधात मैदानात उतरल्याचे चित्र मतदारसंघात आहे.

हेही वाचा :

मंडलिक, मानेंसाठी मुख्यमंत्री शिंदेंचे बेरजेचे गणित; कोल्हापुरात ठरणार रणनीती

सांगलीत जागा गमावली तरी काँग्रेसमध्ये आणखी एका नेत्याचा उदय

इडन गार्डनवर पंजाबच्या फलंदाजांचे तांडव! 262 धावांचे रेकॉर्ड ब्रेक