आयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात आज इडन गार्डनवर कमालच्या फॉर्ममध्ये असलेली कोलकात नाइट रायडर्सविरूद्ध पंजाब किंग्सचा (IPL) सामना रंगणार आहे.
आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये खेळत आहे, तर पंजाब किंग्सच्या संघाचा फॉर्म हा थोडा डगमगलेला आहे. पंजाबचा संघ अजूनही आपली गाडी रूळावर आणण्याचा(IPL) प्रयत्न करत आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये केकेआर ही 10 पॉइंट्स सोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पंजाबचा संघ 4 पॉइंट्स सोबत नवव्या स्थानावर आहे. तर आज बघण्यायोग्य गोष्ट असणार की, केकेआर आज पण आपला बेधडक खेळ खेळणार की, पंजाब किंग्स आज बाजी मारणार?
पंजाब किंग्सच्या फलंदजांनी, इडन गार्डनवर आज रणांचे तूफान आणलं आहे. 8 बॉल बॉकी ठेवत पंजाबने तब्बल 262 धावांचे आव्हान चेस केले आहे आणि पॉइंट्स टेबलमध्ये महत्वाचे 2 पॉइंटस मिळवले आहेत
16 व्या ओव्हरमध्ये जॉनी बेयरस्टोने 45 बॉलमध्ये 8 चौकार आणि 8 षटकार मारून आपलं तडाखेदार शतक पूर्ण केलं आहे.
15 ओव्हरंतर पंजाब किंग्सचा स्कोर 201-2 असा आहे. बेयरस्टो हा 97 धावांवर खेळतोय, तर शशांक सिंग हा 19 धावांवर खेळत आहे. पंजाबला येथून 30 बॉलमध्ये 61 धावा लागत आहेत.
पंजाबला 13 व्या ओव्हरमध्ये राईली रूसोच्या रूपात दुसरा झटका लागला आहे. रूसो हो 26 धावांवर बाद झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर शशांक सिंग हा फलंदाजीसाठी आलाय.
6 व्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्सला पहिला धक्का बसला आहे. धाकड खेळी खेळत असणारा प्रभसिमरन सिंग हा 54 धावांवर आउट झाला आहे. त्याने आपल्या इनिंगमध्ये 4 चौकार आणि 5 षटकार मारले होते. पहिल्या विकेटनंतर राईली रूसो हा फलंदाजीसाठी आलाय.
5 ओव्हरनंतर पंजाबच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात दिली आहे. प्रभसिमरन सिंगने फक्त 18 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलंय, तर बेयरस्टो पण 22 धावांवर खेळत आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने 20 ओव्हरच्या समाप्तीनंतर 262 धावांचे आव्हान दिलं आहे. केकेआरकडून सॉल्टने 75, नरेनने 71, रसलने 24, श्रेयस अय्यरने 28, तर वेंकटेश अय्यरने 39 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत पंजाब किंग्सकडून अर्शदिप सिंगने 2, सॅम करनने, हर्षल पटेल आणि राहूल चहर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत.
अर्शदिप सिंगने 16 व्या ओव्हरमध्ये आंद्रे रसल याला 24 धावांवर बाद केलं आहे. रसलने आपल्या या छोट्या पण घातक खेळीमध्ये 2 चौकार आणि 2 षटकार मारले होते.
हेही वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा तपोवन वर
टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघातून हार्दिक पांड्याला डच्चू?
दिल्ली उच्च न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात याचिका; आज होणार सुनावणी