दिल्ली उच्च न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात १५ एप्रिल रोजी याचिका(high court lawyer) दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज महत्वापूर्ण सुनावणी पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
आनंद जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. मोदी(high court lawyer) धार्मिक वक्तव्य करतात, देवाच्या नावाने आणि पूजा स्थळाच्या नावाने मत मागतात म्हणून त्यांच्यावर ६ वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कलम १५३ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आणि लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार मोदी यांच्यावर ६ वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र करावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
वकील आनंद जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायमुर्ती सचिन दत्ता यांच्यासमोर आज दिल्ली उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. कोर्ट ही याचिका स्वीकारते की फेटाळते हे आज समजणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ एप्रिलला उत्तर प्रदेशात केलेल्या भाषणात हिंदू आणि शीख गुरूंच्या नावाने मते मागितली. तसेच पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांना मुस्लिमांशी जोडले. असे करणे म्हणजे लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन होय. पंतप्रधान मोदींना निवडणुकीसाठी अपात्र घोषित करा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामुळे लोकसभा निवडणुकीत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन पंतप्रधानांवर कारवाई करावी, असंही याचिकाकर्त्यांने म्हटलं आहे.
पंतप्रधान विमानाने देशभर फिरत आहेत आणि अशी भाषणे करत आहेत, ज्यामुळे एखाद्या समुदायाविरुद्ध द्वेषाचे वातावरण निर्माण होऊ शकते. देशभरात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अशा भाषणांवर बंदी घातली पाहिजे, असे आरोप करत मोदींविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा :
पंकजा म्हणाल्या, प्रीतमला नाशिकमधून उभी करेन!
चंद्रहार पाटलांच्या अडचणींमध्ये वाढ; मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
दारूचा प्रत्येक थेंब करतो नुकसान, लिव्हर किती खराब झालंय हे घरीच तपासा