मंडलिक, मानेंसाठी मुख्यमंत्री शिंदेंचे बेरजेचे गणित; कोल्हापुरात ठरणार रणनीती

लोकसभा निवडणुकीसाठी वाट्याला आलेल्या जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री(strategy) एकनाथ शिंदेंनी मोठी फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांतील दोन्ही उमेदवारांना पुन्हा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे जुळवाजुळव करण्यासाठी पुन्हा कोल्हापुरात दोन दिवस तळ ठोकणार आहेत. या वेळी ते कोणती रणनीती आखणार, कोणाला गळाला लावणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

कोल्हापूरचे उमेदवार(strategy) संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये येणार आहे. ते दोन दिवस मुक्कामी राहून आपल्या शिलेदारांसाठी प्रचार करणार आहेत. ते शुक्रवारी (ता. 26) आणि शनिवारी (ता. 26) असे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. ते कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांत फिल्डिंग लावणार आहेत. दरम्यान, दोन आठवड्यांतच मुख्यमंत्री शिंदेंचा कोल्हापूरच्या तिसरा दौरा आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर मुख्यमंत्री शिंदेंनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

कोल्हापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (ता. 27) सभा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा कोल्हापूर दौरा निश्चित झाला आहे. त्यानुसार ते शुक्रवारी रात्रीच कोल्हापुरात दाखल होणार आहेत. दरम्यान, ते खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील मानेंचा यांचा अर्ज भरण्याआधी शिंदे दोन दिवसांसाठी कोल्हापूरला आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचनंतर ते मुंबईला गेले होते. या वेळी त्यांनी नियोजन मंडळाचे कार्यकारी आध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या घरी भेटी दिल्या होत्या.

अर्ज भरण्यासाठी शिंदे 17 एप्रिलला कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार महादेवराव महाडिक आणि समरजित घाटगे यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या होत्या. आता शिंदे पुन्हा येणार आहेत. यामध्ये प्रमुख नेते मंडळी, सहकारी संस्थांचे प्रमुख, उद्योजक यांच्या ते भेटी घेण्याची शक्यता आहे. गाठीभेटींच्या माध्यमातून आणखी काही दुरुस्त्या करण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

कोल्हापुर महापालिकेनं पीएम मोदी येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!

कोल्हापूरात मोदींच्या सभेसाठी दिल्लीची यंत्रणा सतर्क; 12 किलोमीटर परिसरात कडेकोट बंदोबस्त !

क्षीरसागरांनी राजघराण्याची दुखती नस दाबली, कोल्हापूरच्या राजकारणात ‘कदमबांडे’ नावाची एन्ट्री