पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली समूह नवीन कंपनी(new company) खरेदी करण्याच्या तयारीत आहे. समूह कंपनी पतंजली फूड्स पर्सनल केयर उत्पादनांच्या व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांचे अधिग्रहण करू शकते. या अंतर्गत, कंपनीचे डेंटल केयर, होम केअर आणि पर्सनल केयर श्रेणीतील उत्पादनांची बाजारपेठ वाढवण्यावर असेल.

पतंजली फूड्सने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की त्यांच्या संचालक मंडळाने(new company) पतंजली आयुर्वेद लिमिटेडकडून गैर-खाद्य व्यावसायिक उपक्रमाच्या विक्रीसाठी प्राप्त झालेल्या प्राथमिक प्रस्तावावर चर्चा केली आहे. पतंजली फूड्स लिमिटेड ही कंपनी प्रामुख्याने खाद्यतेलाच्या व्यवसायात गुंतलेली आहे. स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये असे म्हटले आहे की, प्रवर्तक समूह पतंजली आयुर्वेदाच्या नॉन-फूड व्यवसायाच्या अधिग्रहणाच्या प्रस्तावाचे मूल्यमापन करेल.

बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली फूड्सच्या एकूण व्यवसायात 50-60 टक्के वाटा हा डेंटल केअर, होम केअर, पर्सनल केअर श्रेण्यांतील उत्पादने घेण्याकडे लक्ष देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पतंजली आयुर्वेद लिमिटेडकडून गैर-खाद्य व्यवसायाच्या विक्रीसाठी प्राप्त झालेल्या प्राथमिक प्रस्तावावर संचालक मंडळाने चर्चा केली आहे.

‘या’ कंपन्या यापूर्वीच ताब्यात घेतल्या आहेत
-पतंजली फूड्सने मे 2021 मध्ये पतंजली नॅचरल बिस्किट्स प्रायव्हेट लिमिटेडचा बिस्किट व्यवसाय 60.03 कोटी रुपयांना विकत घेतला होता.

-याशिवाय, जून 2021 मध्ये 3.50 कोटी रुपयांना नूडल्स व्यवसाय आणि मे 2022 मध्ये पतंजली आयुर्वेदाकडून 690 कोटी रुपयांचा खाद्यान्न व्यवसाय देखील विकत घेतला होता.

-पतंजली फूड्स लिमिटेड (पूर्वीची रुची सोया इंडस्ट्रीज), सन 1986 मध्ये स्थापन झाली, ही दैनंदिन वापरातील उत्पादने तयार करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे.

हेही वाचा :

काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी दिला : राजेश क्षीरसागर

संजयकाका पाटलांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या स्वकियांची भाजपकडून गच्छंती

सांगलीत जागा गमावली तरी काँग्रेसमध्ये आणखी एका नेत्याचा उदय