शिरुर लोकसभेतील आघाडी आणि महायुतीचे उमेदवार एकमेकांवर दररोज सडकून(political news today) टीका करीत आहेत. आघाडीचे कोल्हे, तर त्यांच्या पराभवाचा विडा उचललेले थेट अजित पवारांवरच निशाणा साधत आहेत.त्यामुळे अजित पवारही कोल्हे यांच्यावर प्रतिहल्ला करीत आहे. शनिवारी (ता. 27) त्यांनी तो पुन्हा पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे केला.
आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी पाच वर्षांपूर्वी (political news today)आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोना आला.या संकटातच “ते” राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री पवार यांनी शिरूर लोकसभेचे उमेदवार आणि खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याबाबत केला.
तुम्हाला कशासाठी राजीनामा द्यायचा आहे. असे करू नका, असे मी त्यांना मी विचारलेही होते, असे ते म्हणाले. महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख,बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
ही निवडणुक देशाची असून गावकी भावकीची नाही. तिचा निकाल आपले भविष्य ठरवतो. विकासात्मक पातळीवर देशाला पुढे नेण्याचे काम या निवडणुकीतून करायचे आहे. त्यासाठी विकासाची दृष्टी असणारा ताकतीचा नेता आपल्या शिरूरमधून संसदेत पाठवायचा आहे. आढळराव हे विकासाचे व्हिजन ठेवणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याचे काम आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करायचे आहे,असे आवाहन अजितदादांनी यावेळी केले.
यावेळी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष शाम लांडे, फजल शेख, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, माजी नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, चंद्रकांत वाळके, धनंजय भालेकर, संजय औसरमल, अतिश बारणे, गंगा धेंडे, महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, दीपक साकोरे, अपूर्व आढळराव पाटील, सारिका पवार, मनीषा गटकळ आदी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा :
महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात
आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही