शिंदेंचा दणका; काँग्रेस शहराध्यक्ष्यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील(politics) यांनी रविवारी 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी प्रदीप पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली.

प्रदीप पाटील हे 1995 पासून अंबरनाथ नगरपालिकेचे(politics) नगरसेवक असून माजी विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत. अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची एकहाती धुरा सांभाळली. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले.

प्रदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ, चरण रसाळ, माजी नगरसेवक सुरेंद्र यादव, बबन तांबे, मनोज देवडे, बिस्मिल्ला शेख, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा, नयना पवार, विद्या नागदिवे, अर्चना प्रसाद, मनीषा परमल, युथ काँग्रेसचे हर्षल भोईर, देवराज अल्झानडे, संकेत तांबे, आशिष डुबली ईशान जाधव, अश्फाक खान, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव, ज्ञानेश्वर शेलार, अनिल कांबळे, प्रशांत उतेकर हे प्रमुख पदाधिकारी तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. आगामी काळात पूर्ण ताकदीने शिवसेनेचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली.

हेही वाचा :

सक्तीची राजकीय निवृत्ती!

महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात

आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही