इंडियन प्रीमिअर लीगचा अंतिम सामना(t20 world cup) 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे 1 जूनपासून टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदा या स्पर्धेत तब्बल 20 संघांचा समावेश आहे. 1 मे पर्यंत सर्व सहभागी देशांना आपला संघ जाहीर करायचा आहे. याची सुरुवात न्यूझीलंड संघाने केली आहे. आयसीसी टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडने 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. अनुभवी केन विल्यम्सनकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.
नुकताच न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला त्यांच्याच घरात धुळ चारली होती. याच संघातील खेळाडूंना टी20 वर्ल्ड कपसाठी(t20 world cup) संधी देण्या आली आहे.
टी20 वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या न्यूझीलंड संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा मिलाफ आहे. केन विल्यम्सन, टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट या दिग्गज खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर त्यांच्या जोडीला रचिन रविंद्र, ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमेन सारख्या युवा आणि आक्रमक खेळाडूंची साथ असणार आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचा हा तब्बल सहावा टी20 वर्ल्ड कप असणार आहे. तर ट्रेंट बोल्टची पाचवी आयसीसी स्पर्धा असणार आहे. न्यूझीलंडला आतापर्यंत एकदाही टी20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.
गेल्या काही काळात चांगल्या कामगिरीनंतरही टिम सिफर्ट, टॉम लॅथम आणि विल यंग यांना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे न्यूझीलंडच्या क्रिकेट चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. याशिवाय कायले जेमिन्सन आणि अॅडम मिल्न दुखापतीमुळे टी20 वर्ल्ड संघातून बाहेर आहेत. अनुभवी कॉलिन मुनरोही न्यूझीलंडच्या संघाता आपली जागा बनवण्यात अपयशी ठरला आहे. बेन सियर्सला रिझर्व्ह खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे.
टी20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या 15 खेळाडूंच्या संघावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनन आणि मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी आनंद व्यक्त केला आहे. संघ संतुलित असून यावेळी आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ संपवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे
T20 वर्ल्ड कप 2024 साठी न्यूझीलंडचा संघ
केन विलियमसन (कर्णधार), फिन एलेन, मार्क चॅपमॅन, माइकल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, डेवन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, टिम साऊदी, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, मॅट हेनरी, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅटनर, ईश सोढी
न्यूझीलंडचं मिशन टी20 वर्ल्ड कप
टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये न्यूझीलंडचा पहिला सामना अफगाणिस्तानशी रंगणार असून 7 जूनला गयानात हा सामाना खेळवला जाईल. यानंतर किवी टीम यजमान वेस्टइंडिज, युगांडा आणि पापुआ न्यू गिनीबरोबर दोन हात करेल. टी20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड संघाला ग्रुपी ‘सी’मध्ये ठेवण्यात आलं आहे.
हेही वाचा :
कोल्हापूरचा दत्तक प्रकरण त्यावर अकारण राजकारण!
शिंदे राहिले त्या हॉटेलमध्ये काय घडलं ? सतेज पाटील करणार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार
“मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण करत…”, रोहित पाटलांची टीका