Live कॉन्सर्ट थांबवून अरिजीत पाकिस्तानी अभिनेत्रीला म्हणाला Sorry!

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची भारतातही(live concert) खूप लोकप्रियता आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. आता ती चर्चेत येण्याचं कारण एक कॉन्सर्ट आहे. माहिरा खान ही दुबईत अरिजीत सिंगच्या म्यूजिकल कॉन्सर्टमध्ये दिसली होती. त्याचा व्हिडीओ आका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी असं काही झालं की कॉन्सर्ट सुरु असताना मध्येच अरिजीतनं थांबवत माहिराची माफी मागितली आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत(live concert) अरिजीत हा तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना माहिराची ओळख करुन देताना दिसतोय. तुम्हाला आश्चर्य होत असेल… मग मी खुलासा करू लगेच? मी खूप चांगल्या प्रकारे खुलासा करायला हवं असं मला वाटतं. आपण त्या ठिकाणी एक कॅमेरा लावू शकतो का? मी त्या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा आठवलं की मी तर त्यांच्यासाठी गाणं गायलं आहे. बंधू आणि भगिनींनो… माहिरा खान माझ्या समोर बसलेली आहे. विचार करा मी त्यांचं जालिमा हे गाणं गात होतो आणि हे त्यांचं गाणं आहे आणि त्या देखील हे गाणं गात होत्या. समोरच उभ्या होत्या, पण त्यांना ओळखू शकलो नाही. मला माफ करा. मॅम तुमचे आभार मानतो. अरिजीत हे सगळ बोलत असताना माहिरा लाजताना दिसली.

व्हिडीओमध्ये पुढे जशी अरिजीतनं माहिराची ओळख करुन दिली आणि तिचा चेहरा स्क्रिनवर तिचा चेहरा दिसला त्यानंतर तिनं प्रेक्षकांना नमस्कार केला आणि लाजली, कारण सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे आलं होतं. दरम्यान, अरिजीत आणि माहिराचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी गायकाची स्तुती केली आहे. अनेकांनी कमेंट केल्याकी अरिजीत हा फक्त एक उत्तम गायक नाही तर एक चांगला माणूस देखील आहे.

माहिराच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर तिनं नुकतंच दुसरं लग्न केलं आहे. तिच्या नवऱ्याचं नाव सलीम करीम आहे. तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तर माहिराचा पहिल्या लग्नातून मुलगा देखील आहे. तिच्या या लग्नात तिच्या मुलानं तिला साथ दिली होती. लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात तो देखील तितकाच उत्साही आणि आनंदी दिसला.

हेही वाचा :

कोल्हापूरचा दत्तक प्रकरण त्यावर अकारण राजकारण!

“विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय”; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले…

टी20 वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा, मॅच विनर बाहेर, ‘या’ खेळाडूंना संधी