भाजपला महाराष्ट्राबद्दलचा कॉन्फिडन्स नाही म्हणून पाच टप्प्यात निवडणुका(decision) जाहीर झाल्या. महाराष्ट्र मध्ये किमान दहा वेळा मोदी येतील तरी राज्यात काही फरक पडणार नाही असा दावा आज (साेमवार) महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील आणि मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. महागाई, बेरोजगारी, घटना बदलण्यासंदर्भात त्यांच्या खासदारांची वक्तव्य असल्याने लोकांनी महाविकास आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे सतेज पाटील यांनी नमूद केले.
काेल्हापूर लाेकसभा मतदारसंघात इंडियाचा आघाडीचे उमेदवार(decision) शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या (मंगळवार) कोल्हापूर मध्ये येत आहेत. गांधी मैदाना येथे हाेणारी सभा न भूतो न भविष्याती अशी असेल असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.
सतेज पाटील म्हणाले शाहू महाराज निवडणुकीला उभारले त्यावेळी एवढं प्रेस्टीज भाजपकडून होणार नाही असं वाटलं होतं. राजर्षी शाहू महाराजांचा विचार दिल्लीत पोहोचला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेचा विचार आहे. मुख्यमंत्री सगळ्या गोष्टी सोडून कोल्हापुरात बसलेले आहेत याचं कारण कळत नाही असेही पाटील यांनी नमूद केले.
कोल्हापूरकरांचा निर्णय पक्का झालेला आहे. आपल्या गादीचा सन्मान ठेवायचा, शाहूंचे विचार पुढे न्यायचे. त्यामुळे त्यांनी कशाचाही वापर केला तर त्याचा परिणाम कोल्हापूरकरांवर होणार नाही. शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या विचाराला ते विरोध का करत आहेत ? हे कळत नाही. आता जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर बाेलताना सतेज पाटील म्हणाले भाजपला महाराष्ट्राबद्दलचा कॉन्फिडन्स नाही आहे म्हणूनच पाच टप्प्यात निवडणुका जाहीर झाल्या. महाराष्ट्र मध्ये किमान दहा वेळा मोदी येतील खरे पण राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना कॉन्फिडन्स उरलेला नाही. मोदी आल्याने देखील राज्यात काही फरक पडणार नाही असे पाटील यांनी स्पष्ट केले.
शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी उध्दव ठाकरे आणि शरद पवार उद्या कोल्हापूर मध्ये येत आहेत. गांधी मैदानात होणारी ही सभा न भूतो न भविष्याती अशी असेल असे मालोजीराजे छत्रपती यांंनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे जनतेच ठरल आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली असली तरी त्याचा फरक इथे पडणार नाही असेही मालोजीराजेंनी नमूद केले.
हेही वाचा :
“पोलिसांनो! जे करायचं ते करा”; राजू शेट्टी भडकले
Live कॉन्सर्ट थांबवून अरिजीत पाकिस्तानी अभिनेत्रीला म्हणाला Sorry!
टी20 वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा, मॅच विनर बाहेर, ‘या’ खेळाडूंना संधी