‘गेल्या 10 वर्षांत मोदींनी खूप काम केल्याने ते महाराष्ट्रात गरागरा फिरत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस(congress) शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष-खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची खिल्ली उडविली.
‘जर मोदींनी 10 वर्षांत खूप काम केले आहे, तर त्यांना काम सांगण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरण्याची गरजच का भासते?’ असा सवाल करीत शरद पवार यांनी फटकारले आहे.(congress)
साताऱयाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ वाई येथे आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, ‘देशाचे राजकारण उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी यांनी केले. भ्रष्टाचार करणाऱयांना बरोबर घेऊन देशात दबावाचे राजकारण सुरू आहे. त्यांच्याविरोधात बोलणाऱयांना थेट तुरुंगात डांबले जातेय. त्यांची पक्ष पह्डण्याची भूमिका लोकांना पटलेली नाही. देश एकसंध ठेवायचा असेल, लोकशाही मजबूत करायची असेल, तर राजकीय पक्ष व्यवस्थित चालतील, याची काळजी घेतली पाहिजे.
आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना समाजाचे भविष्य कळत नाही. पंतप्रधानांच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्र वेगळय़ा रस्त्याने जाणार आहे. चुकीचे राजकारण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पावले टाकली, त्यांच्या हातात जनता देश देणार नाही. लोकांच्या मनामध्ये नसलेल्या गोष्टी आणून देशाचा कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोदी यांची धोरणे महागाई कमी करण्याची नाहीत, तर ती वाढवण्याची आहेत,’ असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
‘देशाची लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी, महागाई वाढवून गोरगरीबांचे पंबरडे मोडणाऱयांना धडा शिकवण्यासाठी सत्ताबदल करावाच लागेल,’ असे आवाहन शरद पवार यांनी केले.
हेही वाचा :
“पोलिसांनो! जे करायचं ते करा”; राजू शेट्टी भडकले
PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का
कदमबांडे यांना आत्ता येण्याची वेळ का आली? सतेज पाटलांनी थेट सांगितले…