कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी(political action committees), उपद्रव मूल्य दाखवण्यासाठी, तोंडपाटीलकी करण्यासाठी, तोंड सुख घेण्यासाठी, तुम्ही कुठे चुकला, कुठे चुकत आहात? याचे स्मरण करून देण्यासाठी, त्यांचं बिनसलं कशात हे जाहीरपणे सांगण्यासाठी, गरजण्यासाठी, बरसण्यासाठी निवडणूक प्रचारासारखं मोठं व्यासपीठ नाही. अनेक राजकारणी ह्या व्यासपीठाचा एक संधी म्हणून वापर करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे घराण्याविषयी”मन की बात” सांगितल्यावर उलट सुलट प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे व्यक्त होऊ लागलेल्या आहेत.
“राधा सुता, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?”अशा आशयाचा सवाल उद्धव ठाकरे(political action committees) यांनी नरेंद्र मोदी यांना विचारल्यानंतर राज ठाकरे हे त्यांच्यावर बरसले आहेत. नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दोन दिवसापूर्वी दिलेल्या मुलाखतीत ठाकरे घराण्याविषयी”मन की बात” पहिल्यांदाच सांगितल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता त्यावर उद्धव ठाकरे यांची काय प्रतिक्रिया येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिले होते. त्यांची प्रतिक्रिया तशी दुसऱ्या मनासारखी आहे. मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांच्या खोलीत मला दिला होता. हे मी अनेकदा शपथेवर सांगितले आहे. दिलेला शब्द का पडला नाहीत? माझे सरकार पाडले जात होते तेव्हा तुम्ही कुठे होतात? असे सवाल उपस्थित करून उद्धव ठाकरे यांनी तुम्ही अडचणीत याल तेव्हा तुमच्या मदतीसाठी मी सुद्धा येईन. हे सांगितल्यावर त्यावर सुद्धा प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत.
नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कोकणात गेलेल्या राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. तुम्ही साडेसात वर्षे महाराष्ट्राच्या सत्तेत होता. त्यातील अडीच वर्षे मुख्यमंत्री होता. तेव्हा महाराष्ट्रातून बाहेर जात असलेल्या उद्योगांना प्रकल्पांना तुम्ही का अडवले नाही? भारतीय जनता पक्षाने तुम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले असते तर आत्ता तुम्ही जे बोलत आहात ते बोलला असता का? सत्तेचा बोळा तेव्हा तुमच्या तोंडात गेला असता तर आजची भाषा तुम्ही बोलला नसता. असे शब्द बाण राज ठाकरे यांनी त्यांच्यावर सोडले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी ठाकरे घराण्या विषयी, जे काही आपले म्हणणे मांडले आहे त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी”नरेंद्र मोदी यांची मदत घेण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर येऊ नये”असे म्हटले आहे. तर वंचित चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भविष्यातील राजकारणात उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एकत्र येऊ शकतात असे भाकीत केले आहे.मराठवाड्यातील प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी”सिंघम”चित्रपटातील लोकप्रिय संवादच बोलून दाखवले आहेत. आली रे आली, आता माझी पाळी आली. आता माझी सटकली.
आता मी सटकावणारच”असे संवाद बोलून उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या आहेत. कोकणात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी एकेरी भाषा वापरली आहे. पोलीस बंदोबस्तात कशाला फिरतोस? असा प्रश्न विचारला आहे. तर त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, तू आडवा आलास तर तुला गाडल्याशिवाय पुढे जाणार नाही असा दम दिला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात वातावरण चांगलेच तापले आहे. कधी नव्हे त्या सुप्रिया सुळे अजितदादा पवार यांच्यावर कडाडल्या आहेत. गेले सात-आठ महिने मी गप्प आहे. याचा अर्थ मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही असा होत नाही. माझ्या आई बद्दल काही बोलाल तर करारा जबाब दिला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
तर मुंबईत संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, नितेश राणे, संजय शिरसाट ही मंडळी एक शब्द खाली पडू देत नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढाई असली तरी, महायुतीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना केंद्रस्थानी ठेवून टीका टिपणी सुरू केली आहे तर महाविकास आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना टार्गेट केले आहे. त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सामना चांगलाच रंगला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यात ही मंडळी पुन्हा एकमेकांसमोर येणार आहेत. एका ठिकाणच्या तोफा थंड झाल्यानंतर त्यात दुसऱ्या ठिकाणी धबाडताना दिसणार आहेत.
हेही वाचा :
तेजस्वी सूर्या मासे खातात, गुंडगिरी करतात; भाजप खासदाराबद्दल कंगना काय बोलून गेली?
सांगली : वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? प्रकाश शेंडगेंचा सवाल
संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात ‘टशन’; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी