कोल्हापूरमध्ये मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराचा झटका(queue management) आल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये एका जेष्ठ नागरिकाचा मतदान रांगेतच मृत्यू झाला आहे. मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत ही घटना घडली आहे. महादेव श्रीपती सुतार, असं या वृद्ध मतदाराचं नाव आहे. त्यांचं वय ६९ वर्षे असल्याची माहिती मिळत आहे.
उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान(queue management) केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या वृध्द मतदाराचा मृत्यू झाला आहे. ते रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान करण्यासाठी गेले होते. ते रांगेत उभे असताना महादेव श्रीपती सुतार यांना चक्कर आली. ते खाली कोसळले. त्यानंतर मतदान केंद्रावर मोठी खळबळ उडाली होती. मतदाराने रांगेतच जीव सोडल्यामुळे परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्ती केली जात आहे.
खाली पडल्यानंतर ६९ वर्षीय मतदार महादेव श्रीपती सुतार यांना नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. रूग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती.
महाडमद्ये मतदान करण्यासाठी निघालेल्या एका मतदाराचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. प्रकाश चिनकटे असं या मृत मतदाराचं नाव आहे. हा मतदार महाड तालुक्यातील दाभेकर कोंड किंजळोली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. परंतु या मतदाराचा मृत्यू कशामुळे झालाय, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मतदान केंद्रापासून १०० किमी दूर असताना चिनटे खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं आहे.
हेही वाचा :
कोणाच्या डोळ्यात आसू तर कोणाच्या हाती वस्तरा
हातकणंगलेमध्ये गोंधळ, धैर्यशील माने आणि सरुडकर गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
मोदींनीच पोस्ट केला स्वत:चा नाचतानाचा Video! पोलिसांचं टेन्शन का वाढलं?