मी मी करणाऱ्यांना निवडणुकीत पाडलं असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री(challenge) अजित पवारांनी शिरुरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना पुन्हा आमदार कसा होतो हेच पााहतो, असे थेट आव्हान दिले होते. अजित पवारांच्या या आव्हानानंतर अशोक पवार यांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिले आहे.
“कोणाला आमदार, खासदार करायचे हे जनता ठरवते(challenge). असे आव्हान देणं गैर आहे. जनता आणि शरद पवार माझा पुढचा प्रवास ठरवतील. मला आमदारकी, मंत्री पदाची हाव नाही, आमच्यासाठी निष्ठा महत्वाची आहे. राजकारणातल्या चांगल्या माणसाने फक्त त्रास आणि पाडायचीच भाषा वापरावी का? ही भाषा जनतेला मान्य नसते,” असे प्रत्यूत्तर अशोक पवार यांनी दिले.
तसेच “पाठिंबा देत नाही म्हणुन असा त्रास द्यायचा का? मी कोणाला आव्हान देणार नाही पण येणारा काळ ठरवेल. लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. काहीही अपेक्षा न ठेवता शरद पवारांसोबत आहे. राजकारणात अशी आव्हाने देणं चांगलं नाही आणि अजित पवारांच्या तोंडात हि वाक्य येऊ नये,” असेही अशोक पवार यावेळी म्हणाले.
त्याचबरोबर घोडगंगा कारखाना बंद पाडल्याचा आरोपही त्यांनी अजित पवार यांच्यावर केला. “घोडगंगा दिवळखोरीत नसताना कर्ज प्रक्रिया थांबवली. पिडिसीसी बँकेने कर्ज दिलं नाही. तुम्ही कर्जच द्यायला नकार दिला आज कर्जाशिवाय कारखाना कसा चालणार? घोडगंगाच बंद झाला असं म्हणण्यापेक्षा कोणी बंद पाडला हे पाहा,” असे म्हणत समोर येऊन चर्चा करायची तयारी आहे असे आव्हानही अशोक पवारांनी अजित पवारांना दिले.
हेही वाचा :
निकाल जाहीर होण्यापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता परिक्षा…
राजकारणातून संन्यास घ्यायचा, नाहीतर संपवून टाकेन…’ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी
कोल्हापूर : अबब! 500 पासून ते लाखांपर्यंतच्या पैजा; निकालानंतर कुणाचा खिसा गरम होणार तर कुणाचा खाली…