३ फूट उंचीचा बिग बॉस फेम अब्दू रोझिक अडकणार लग्नबंधनात

गायक अब्दू रोझिकच्या प्रसिद्धीत ‘बिग बॉस १६’ पासून फार मोठी वाढ झाली आहे(married). अब्दू रोझिक सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अब्दू रोझिकने काल संध्याकाळी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये, तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचा बोलला आहे. त्याच्या आयुष्यामध्ये खास व्यक्तीने एन्ट्री केली आहे. पण त्याने पोस्टमध्ये कोणासोबत लग्न करणार आहे, हे सांगितलेलं नाही.

अब्दू रोझिकने गुरूवारी संध्याकाळी एक इन्स्टाग्राम पोस्ट (married)शेअर केली आहे. तो ७ जुलैला लग्न करणार असल्याचं म्हटला आहे. अब्दू मुळचा दुबईचा आहे. दुबईमध्ये अब्दू लक्झरीयस लाईफ जगत आहे. तो दुबईमध्ये अमीरा नावाच्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘मी आयुष्यात इतका भाग्यशाली असेल, याचा मी केव्हाही विचार केला नव्हता. मला लाईफ पार्टनर मिळेल, जी माझ्यावर खूप प्रेम मिळेल आणि ती माझाही आणि माझ्या प्रेमाचीही आदर करेल. माझ्या आयुष्यातील अडचणींना त्रास समजत नाही. ७ जुलै तारीख लक्षात ठेवा.. मी शब्दात नाही सांगू शकत की मी किती आनंदी आहे…’ असं अब्दू रोझिक आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अब्दू म्हणतो, “मी २० वर्षांचा आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. माझ्या आयुष्यात माझ्यावर प्रेम करणारी आणि माझा आदर करणाऱ्या व्यक्तीच्या मी शोधात आहे. माझ्या मनाप्रमाणे साथीदार मिळण्यासाठी मी खूप स्वप्न पाहिले आहे. आता अचानक माझ्या आयुष्यात एका मुलीने एन्ट्री केली आहे. सध्या मी खूप खुश आहे. ” असं म्हणत त्याने अंगठीही दाखवला आहे.

शिव ठाकरेने अब्दुच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. शिव ठाकरे म्हणाला, “अब्दू नेमका कोणत्या मुलीसोबत लग्न करतोय, हे मला माहित नाही. मी अब्दूसोबत अर्ध्या तासांपूर्वीच बोललो होतो, तो तसं मला काही बोलला नाही. पण त्याच्या रिलेशनची बातमी मला सोशल मीडियावरूनच मिळाली. तो मला लग्नाबद्दल काहीही बोलला नाही. ही बातमी खोटी आहे की खरी हे ही मला माहीत नाही.” असं तो म्हणाला.

हेही वाचा :

पाकिस्तानला सन्मान द्या, अन्यथा बॉम्ब फोडतील; कॉंग्रेस नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

‘तू कसा आमदार होतो तेच बघतो’, अजित दादांचे थेट आव्हान

नरेंद्र मोदी ४ जूननंतर पंतप्रधान नसतील, ते झोला घेऊन हिमालयात जातील; शिवसेना ठाकरे गटाची टीका