निवृत्तीचे 75 वय फक्त आडवाणींनाच होते का?

दिल्लीचे (delhi)मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगातून बाहेर आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना अक्षरशः सळो की पळो करून सोडले आहे. रविवारी सलग दुसऱया दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदी 75 वर्षांचे होणार असले तरी भाजपा नेत्यांनी त्यांच्या निवृत्तीचा विषय फेटाळून लावला आहे. यावर मोदी गप्प का? असा सवाल करतानाच त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱयाचे नाव सांगावे किंवा सरळ सांगावे की, निवृत्तीचा नियम त्यांच्यासाठी नाही तर फक्त लालकृष्ण आडवाणी आणि इतर नेत्यांसाठी आहे. अशा शब्दांत केजरीवाल यांनी मोदींवर तोफ डागली.

मोदी ‘वन नेशन आणि वन लीडर’ ही संकल्पना समोर ठेवून विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगात पाठवण्याचे धोरण अवलंबले आहे आणि आपल्या नेत्यांचे राजकारण संपवू पाहत आहेत, असा आरोपही केजरीवाल यांनी केला. मोदींनी शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, डॉ. रमण सिंह यांसारख्या नेत्यांचे राजकीय करीअर संपवले असून आता पुढचा नंबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा असल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला. मोदी राजकारणातून निवृत्त होणार नसल्याचे भाजप नेते सांगत आहेत, पण योगींना हटवण्याबद्दल काहीच सांगत नाहीत. म्हणजे पुढच्या दोन दिवसांत योगींना हटवण्यात येईल हे निश्चित आहे, असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला.(delhi)
शाळा, हॉस्पिटल्स उघडणार

केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या दहा गॅरंटीची घोषणा केली. याबाबत घटक पक्षांना काहीच सांगितलेले नाही, परंतु शाळा, हॉस्पिटल उघडणार असल्याचे सांगतानाच ‘इंडिया’तील घटक पक्ष आपल्यासोबत असल्याचे केजरीवाल म्हणाले. माझ्या अटकेमुळे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी उशीर झाला, पण अद्याप निवडणुकीचे आणखी काही टप्पे बाकी आहेत. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात येतील याची गॅरंटी मी देतो, असे केजरीवाल म्हणाले. दरम्यान, इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार, असा सवाल पत्रकारांनी केला. यावर मी पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, मात्र विरोधी पक्ष सत्ते आल्यास तुम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर त्यांचा भर असेल, असे केजरीवाल म्हणाले.

आपच्या 10 गॅरंटी

सर्व देशात 24 तास वीज, गोरगरीबांना मोफत वीजपुरवठा
जागतिक दर्जाच्या शाळा उघडून सर्वांना मोफत शिक्षण
प्रत्येक जिह्यात जागतिक दर्जाचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि गावोगावी मोहल्ला क्लिनिक उघडणार
चीनच्या ताब्यातील जमीन परत मिळवण्यासाठी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देणार
अग्निवीर योजना बंद करून सर्व अग्निवीरांना कायमस्वरुपी नोकरी देणार
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करून शेतमालाला किमान हमीभाव देणार
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार
बेरोजगारी संपवून वर्षभरात दोन कोटी रोजगारनिर्मिती
भ्रष्टाचार संपवणार, भाजपचे वॉशिंग मशीन तोडणार
जीएसटीची दहशत संपवणार, जीएसटीला पीएमएलए कायद्याच्या चौकटीबाहेर ठेवणार

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (11-05-2024)

मोदी 21 व्या शतकातील राजे; ते कुणाचेच ऐकत नाहीत

‘मोदी तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का?’; उद्धव ठाकरे कडाडले