बंगळुरू कोमातून बाहेर; दिल्लीवर 47 धावांनी मात

आठ सामन्यांत सात पराभवांची नामुष्की सहन करणाऱया बंगळुरूचे (bangalore)आयपीएलमधील आव्हान जवळजवळ संपुष्टात आले होते. मात्र कोमात गेलेल्या बंगळुरूने आज दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत आयपीएलमध्ये खळबळ माजवली आहे.

आता त्यांचा अखेरचा साखळी सामना चेन्नईविरुद्ध होणार असून त्या सामन्यात मोठा विजय मिळवल्यास ते प्ले ऑफमध्येही स्थान मिळवू शकतात.(bangalore)

रजत पाटीदार (52) आणि विल जॅक्स (41) यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर बंगळुरूने दिल्लीसमोर 9 बाद 187 अशी मजल मारली, पण 188 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला कर्णधार अक्षर पटेलशिवाय कुणीच सावरू शकला नाही. डेव्हिड वॉर्नर (1), जेक फ्रेझर-मॅकगर्क (21), अभिषेक पोरेल (2) यांना लवकर बाद करून बंगळुरूने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. फ्रेझरने आपल्या 8 चेंडूंच्या खेळीत 2-2 चौकार षटकार खेचत 21 धावा केल्या पण तो धावचीत झाला. दिल्लीची 4 बाद 30 अशी बिकट अवस्था असताना अक्षर पटेलने शाय होपसह 66 धावांची भागी रचून संघाच्या विजयाच्या होप जिवंत ठेवल्या.

पण होपनंतर कुणीही त्याच्या साथीला उभा राहिला नाही. तो 57 धावांवर बाद झाला आणि दिल्लीच्या आशाही संपुष्टात आल्या. दिल्ली 19.1 षटकांत 140 धावांवर बाद झाली. यश दयालने 20 धावांत 3 विकेट टिपल्या. त्याआधी विराटच्या 13 चेंडूंतील 27, विल जॅक्सच्या 29 चेंडूंतील 41, रजत पाटीदारच्या 32 चेंडूंतील 52 आणि पॅमेरून ग्रीनच्या 24 चेंडूंतील नाबाद 32 धावांमुळे बंगळुरूने 9 बाद 187 धावांपर्यंत मजल मारली होती.

हेही वाचा :

मोठी बातमी! दिल्लीतील दोन सरकारी हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याचा ई-मेल

संजयकाका पाटील की विशाल पाटील? नेमका कौल कोणाला? सांगली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी लावली चक्क दुचाकींची पैज!

चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर… राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?