बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षितला(dance) कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. माधुरी तिच्या सुंदरतेसोबत, तिच्या अभिनयानं आणि डान्सनं सगळ्यांची मने जिंकताना दिसते. सध्या माधुरी ही ‘डान्स दिवाने’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.
या सगळ्यात या संपूर्ण टीमनं माधुरीचा 15 मे रोजी वाढदिवस(dance) आहे त्यानिमित्तानं आताच सेलिब्रेशन सुरु केलं आहे. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका व्हिडीओत माधुरीचा डान्स पाहून तिचे पती डॉ.नेने यांनी हटके स्टाइलमध्ये तिचं कौतुक केलं आहे. त्यासोबत माधुरीसोबत त्यांनी डान्स देखील केला आहे.
माधुरीच्या वाढदिवसानिमित्तानं स्पर्धकांनी ‘डान्स दिवाने’च्या मंचावर माधुरीच्या वेगवेगळ्या गाण्यांवर परफॉर्म करत तिला सरप्राइज केलं आहे. या एपिसोडमध्ये माधुरीचे पती डॉ. नेने देखील उपस्थित होते. यावेळी स्पर्धक दीपानितानं माधुरीच्या ‘बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल…’ या गाण्यावर डान्स केला.
तिचा डान्स पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. तर तिच्या डान्सनंतर माधुरीनं देखील तिच्यासोबत डान्स केला. तर माधुरीचा डान्स पाहून डॉ. नेनेंनी सगळ्यांसमोरच पत्नीसाठी शिट्या मारल्या. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. माधुरी आणि डॉक्टर नेने यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.
याशिवाय माधुरी आणि डॉक्टर नेने यांचा देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी श्रीराम नेने यांनी माधुरीला त्यांच्या हातानं लिहिलेलं पत्र दिलं. त्यानंतर त्या दोघांनी स्टेजवर येऊन ‘तुमसे मिलके’ या गाण्यावर डान्स केला आहे. एपिसोडच्या सुरुवातीला सगळे स्पर्धक हे माधुरी दीक्षितला गुलाब देताना दिसले. त्याशिवाय त्यांनी सगळ्यांनी मिळून ‘भोली सी सूरत’ गाण्यावर डान्स देखील केला आहे. तर अंकिता लोखंडेनं माधुरीच्या ‘सैलाब’ या 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील ‘हमको आज कल है’ गाण्यावर डान्स केला आहे. त्याशिवाय अंकिता तिच्यासाठी मराठी डिश पोहे घेऊन येते. दरम्यान, माधुरी 15 मे रोजी तिचा 57 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
हेही वाचा :
कुरुंदवाड येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू
कोल्हापूरात रेशन दुकानदारांना मिळणार 5G पॉस मशीन; धान्य वितरणाला येणार गती
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात