राज्यातील तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे(administration) मतदान पार पडले. मात्र, या दोन्ही मतदारसंघातील वाद अजूनही कमी होताना पाहायला मिळत नाहीत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान होऊन सात दिवस झाले असताना प्रशासनाला जाब विचारण्याचे काम काही मतदारांनी केले आहे.
एकीकडे प्रशासन मतदानाचा(administration) हक्क बजावा, असे सांगत असताना दुसरीकडे मतदार यादीतून जवळपास एकाच परिसरातील 50 हून अधिक मतदारांची नावे गहाळ झाल्यामुळे मतदार चांगलेच संतापले आहेत. प्रशासनाकडून उडवा उडवीचे उत्तरे येत असल्याने अखेर या मतदारांनी कोर्टाची पायरी चढण्याचा इशारा दिला आहे
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी विधानसभा मतदान क्षेत्रात पन्नासहून अधिक मतदारांची नावे गहाळ झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी या मतदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यावर अधिकाऱ्यांनी आश्वासन देत या प्रकरणावर तात्पुरता पडदा टाकला होता.
हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील कुमार विद्या मंदिर या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला होता. नागरिकांना मतदानाचा हक्क बाजवता आला नसल्याने त्यांनी केंद्रावरच ठिय्या आंदोलनाचा मार्ग पत्करला होता.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मतदारांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या कोणत्याही अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळत नसल्याने या मतदारांनी कोर्टाची पायरी चढण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. तसेच गहाळ झालेल्या मतदारांचा शोध घेऊन युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या आहेत.
हेही वाचा :
कोल्हापूरात रेशन दुकानदारांना मिळणार 5G पॉस मशीन; धान्य वितरणाला येणार गती
कुरुंदवाड येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू
माधुरीचा डान्स पाहताच डॉ.नेनेंचा उत्साह गगनात मावेना; अभिनेत्रीला पतीनं सगळ्यांसमोर…