ऑर्डर कॅन्सल करणे ‘स्विगी’ला महागात

ऑनलाइन फूड डिलिव्हरी ‘स्विगी’(swiggy)ला एका ग्राहकाची ऑर्डर रद्द करणे चांगलेच महागात पडले आहे. गुजरातमधील कंझ्युमर कोर्टाने स्विगीला दणका दिला आहे. ऑर्डर रद्द केल्यामुळे ग्राहकाला मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे स्विगीने ग्राहकाला 1 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश स्विगीला कोर्टाने दिले आहेत. हे प्रकरण 2022 मधील आहे.

अहमदाबादमधील प्रसाद कानडे या व्यक्तीने स्विगीवरून मिठाई ऑर्डर केली होती. यासाठी त्याने 549 रुपये पे केले. परंतु स्विगीने(swiggy) ही ऑर्डर कोणतेही कारण न सांगता कॅन्सल केली. कानडे यांनी तक्रार केल्यानंतर कंपनीने 445 रुपये रिफंड केले. कंपनीने ऑर्डर रद्द करण्यासंबंधी आधी सांगितले नाही, तसेच रिफंडही पूर्ण दिला नाही. त्यामुळे कानडे यांनी कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनकडे तक्रार दाखल केली.

– रेस्टॉरंट आणि ग्राहक यांच्यातील हे प्रकरण आहे. स्विगी केवळ डिलिव्हरी पार्टनर आहे, असा दावा स्विगीने कोर्टात केला. या दोघांमध्ये स्विगीला जबाबदार धरण्यात येऊ नये, तसेच कानडे यांनी स्वतः ही ऑर्डर रद्द केली होती, असा दावा स्विगीने केला.


– कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कानडे यांच्या बाजूने निकाल दिला. स्विगी डिलिव्हरी पार्टनर असले तरी त्यांनी पेमेंट रिसिव्ह केले आहे. त्यामुळे ते या प्रकरणात जबाबदार आहेत. स्विगीने ग्राहकाच्या रिफंडमधील उर्वरित रक्कम 104 रुपये ही 9 टक्के व्याजाने परत करावी. ग्राहकाला मानसिक त्रासाबद्दल 1 हजार रुपये द्यावेत, असे कोर्टाने सांगितले.

हेही वाचा :

क्रिकेटमधून टॉस होणार गायब; BCCI ने ठेवला नवा प्रस्ताव

मोदी-शहांनी लोटांगणवीर निर्माण केलेत – उद्धव ठाकरे

नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट दही सॅंडविच, जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी