मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत अनेक रस्ते बंद

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबईत (mumbai)येत आहेत. मोदी यांच्या रोड शोसाठी अनेक रस्ते बंद ठेवले जाणार आहेत. विक्रोळी, घाटकोपर येथील 37 ठिकाणी नो पार्किं झोन करण्यात आले आहेत. मोदी यांच्या रोड शोमुळे दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत असे तब्बल 8 तास वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असून मुंबईकरांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

राज्यातील शेवटच्या आणि पाचव्या टप्यासाठी मुंबईत (mumbai)पुढील आठवडय़ात मतदान होणार आहे. पंतप्रधान मोदी हे रोड शोसाठी बुधवारी मुंबईत येत आहेत. ईशान्य मुंबईत हा रोड असल्याने तेथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजणार आहेत. रोड शोमुळे लाल बहादूर शास्त्री मार्गावरील गांधी नगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन (उत्तर आणि दक्षिण) वाहिनी ही बंद असणार आहे.

माहुल घाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आर बी. जंक्शन दोन्ही वाहिनी या सर्व प्रकारच्या वाहनांना दुपारी दोन ते रात्री 10 पर्यंत बंद असणार आहे. या रोडमुळे अंधेरी घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर आणि दक्षिण वह्निवरील वाहतूक, हिरानंदानी पैलास कॉम्प्लेक्स येथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शन येणारी वाहतूक, गोळीबार नगर व घाटकोपर मेट्रो स्थानक येथून सूर्योदय जंक्शन येणारी वाहतूक बंद असेल.


तर रोड शो मुळे रस्ते बंद केल्याने घाटकोपर पूर्व कडील 90 फूट रोड ने पंतनगर पोलीस ठाण्या समोरून एजीएलआर रोडने श्रेयस जंक्शन येथून पश्चिमेला जाता येईल. लाल बहादूर शास्त्राr मार्गाचा वापर करणारी वाहने ही पूर्व द्रुतगती मार्गाचा वापर करतील. अंधेरी घाटकोपर लिंक रोडचा उपयोग करून अंधेरी- कुर्ला मार्गाचा वापर करून पुढे सांताक्रूझ -चेंबूर लिंक रोड, एम जी रोड ने जाणारी वाहने बॅरिस्टर नाथ पै मार्गाचा वापर करून पुढे 90 फूट रोड मार्गे पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर करून इच्छुक स्थळी जातील असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

साठ वर्षापूर्वीच्या जखमेची मंडलिकानी, खपली का काढली?

‘आमचं ठरलंय’नं पलटवली बाजी अन् बंटी पाटलांनी स्वतःच्या पराभवाचा काढला वचपा

हातकणंगलेत जयंत पाटलांचा नवा डाव.. थेट शिंदे समर्थक आमदाराची घेतली भेट; धैर्यशील मानेंच्या अडचणी वाढणार?