कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या(scabs on scalp) आधी सूचनेची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील वातावरण मात्र गुरुवारपासून तापायला सुरुवात झाली आहे. आणि त्याची सुरुवात महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या बद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हे शाहू महाराज खरे नाहीत. ते दत्तक आहेत. असे त्यांनी म्हटले आहे. वास्तविक कोल्हापूरच्या राजघराण्याचा दत्तक इतिहास इथल्या जनतेला माहित आहे. तथापि हा जुनाच इतिहास पुन्हा वर्तमान काळात अनन्या मागे एक सूत्र आहे. सूत्राचाच एक भाग म्हणून, त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे आणि त्याबद्दल ते ठाम आहेत.
छत्रपती शहाजीराजे यांना रक्ताचा वंशज नव्हता, आणि गादीचा उत्तर अधिकारी(scabs on scalp) आवश्यक होता. त्यासाठी त्यांनी त्यांच्या नागपूर येथील मुलीचा मुलगा दिलीप सिंह यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास लोकांचा तेव्हा तीव्र विरोध होता. छत्रपती राजाराम महाराजांच्या कन्या धुळ्याच्या पद्माराजे कदम बांडे यांचे सुपुत्र राजवर्धन (हे धुळे येथील माजी आमदार आहेत) यांना कोल्हापूरच्या गादीचा वारस म्हणून दत्तक घ्यावे असा लोकांचा आग्रह होता. त्यासाठी साठ वर्षांपूर्वी कोल्हापुरात एक उग्र आंदोलन उभा राहिले होते. पण छत्रपती शहाजीराजे यांनी दिलीप सिंह यांनाच दत्तक घेतले तेव्हा कोल्हापूरचे वातावरण अतिशय प्रक्षुद्ध झाले होते. दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाले होते. दिलीप सिंह यांचे नंतर शाहू असे नामकरण करण्यात आले.
विद्यमान श्रीमंत शाहू महाराज यांच्या विषयी साठ वर्षांपूर्वी कोल्हापुरात समताप जनक लोकभावना होती. त्या लोकभावनेला पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न संजय मंडलिक यांचा आहे. कोल्हापूरच्या राजघराण्यावर लाजलेला राजा, तो खरा राजा नव्हेच, ते दत्तक आहेत. अशा आशयाचे वक्तव्य करून साठ वर्षांपूर्वीचा राग इथल्या जनतेने या लोकसभा निवडणुकीत काढावा असा वादग्रस्त वक्तव्या मागचा त्यांचा हेतू आहे. पण तेव्हाचा इतिहास आजच्या पिढीला माहीत नाही आणि दत्त का प्रकरणाच्या वेळचे लोक आज वृद्धावस्थेत आहेत किंवा हयात नाहीत. तरीही सात वर्षांपूर्वी ज्यांना जनतेने नाकारले आहे त्यांच्याविषयी नकारात्मक वातावरण तयार करण्याचा संजय मंडलिक यांचा प्रयत्न आहे मात्र गुरुवारी त्यांच्या या वक्तव्याबद्दल तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसलेला आहे असे म्हणावे लागेल.
कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही राजघराण्यात दत्तक विधानाचे प्रसंग आले आहेत. राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा कागलच्या जहागीरदार घराण्यातून कोल्हापूरच्या राजघराण्यात दत्तक म्हणून आले होते. ते त्यांच्या अलौकिक कार्यामुळे सामाजिक क्रांतीचे जनक ठरले. म्हणूनच ते लोकराजा ठरले. राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा दत्तक होते हे माहीत असूनही संजय मंडलिक हे आत्ताच्या श्रीमंत शाहू महाराजांना ते खरे नाहीत म्हणजे राजघराण्याच्या रक्ताचे नाहीत. ते दत्तक आहेत. असे ते मुद्दाम का म्हणत आहेत? त्यांना साठ वर्षांपूर्वी कोल्हापूर वर झालेल्या जखमेवरची खपली काढावयाची होती आणि त्यांनी ती काढली असली तरी सर्वसामान्य जनतेला ते आवडलेले नाही.
संजय मंडलिक यांचे पिताश्री सदाशिवराव मंडलिक हे सत्यशोधकी विचाराचे होते. जातीयवादी पक्षांना ते शत्रूस्थानी मानत असत. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही पक्ष कमालीचे जातीयवादी आहेत. समाजात ते दुहीची बीजे पेरतात. असे ते कायम म्हणत असत. संजय मंडलिक हे आपल्या पिताश्रींचे पुरोगामीत्व मोठ्या अभिमानाने सांगतात. त्यांचे पिताश्री हे ज्या पक्षांना प्रतिगामी किंवा जातीयवादी समजत होते त्याच पक्षाचे संजय मंडलिक हे आज लोकसभा उमेदवार आहेत. शिवसेना तसेच भारतीय जनता पक्ष हे स्वतःला पुरोगामी समजत नाहीत तर हिंदुत्ववादी समजतात. याचा अर्थ संजय मंडलिक हे आपल्या पिताश्रींच्या वैचारिक भूमिकेच्या विरुद्ध आहेत असा होतो.
एकूणच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपती हे आपले प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत हे स्पष्ट झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून संजय मंडलिक यांनी त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडलेली आहे. श्रीमंत शाहू महाराज यांचे मुख्य प्रचारक सतेज पाटील हे आहेत. त्यामुळे सतेज विरुद्ध संजय यांच्यातील शाब्दिक लढाईला तोंड फुटलेले आहे.
हेही वाचा :
‘आमचं ठरलंय’नं पलटवली बाजी अन् बंटी पाटलांनी स्वतःच्या पराभवाचा काढला वचपा
अजूनही वेळ गेलेली नाही, शाहू महाराजांनी फेरविचार करावा, मुश्रीफांनी पुन्हा डिवचले
कोल्हापुरात गणेशोत्सवात ध्वनीप्रदुषण करणाऱ्या ३९७ मंडळांवर खटले