हातकणंगलेत जयंत पाटलांचा नवा डाव.. थेट शिंदे समर्थक आमदाराची घेतली भेट; धैर्यशील मानेंच्या अडचणी वाढणार?

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकांसाठी(patient) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेरजेचे राजकारण करत जुन्या मित्रांची, राजकीय शत्रूंची भेट घेत डावपेच टाकण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता हातकणंगले मतदार संघात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही थेट शिंदे गटाचे समर्थक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे(patient) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. राजेंद्र पाटील यांच्या जयसिंगपूरमधील निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीवेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटीलही उपस्थित होते.

या भेटीमध्ये जयंत पाटील यांच्याकडून हातकणंगलेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना मदतीसाठी आमदार राजेंद्र यड्रावकरांना साकडं घातल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हातकणंगले मतदार संघातून शिंदे गटाचे धैर्यशील माने हे उमेदवार आहेत. मात्र धैर्यशील माने यांच्या नावाला मोठा विरोध पाहायला मिळाला होता.

धैर्यशील माने यांच्यावरील नाराजीमुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांचे नाव देखील हातकणंगले लोकसभेसाठी चर्चेत होते. परंतु शेवटच्या क्षणी पुन्हा धैर्यशील माने यांनाच उमेदवारी देण्यात आली. अशातच आता जयंत पाटील यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

हेही वाचा :

‘आमचं ठरलंय’नं पलटवली बाजी अन् बंटी पाटलांनी स्वतःच्या पराभवाचा काढला वचपा

साठ वर्षापूर्वीच्या जखमेची मंडलिकानी, खपली का काढली?

अजूनही वेळ गेलेली नाही, शाहू महाराजांनी फेरविचार करावा, मुश्रीफांनी पुन्हा डिवचले