कोल्हापुरात तलवार कोयता घेऊन फिरणाऱ्यांना अटक

कोल्हापूर प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी(walking treadmill) पोलीसांनी त्यांच्या हदद्दीत पहाटेपर्यंत गस्त सुरू असते. संशयास्पद व्यक्ती, वाहनांची तपासणी केली जाते. तसेच अवैधरित्या हत्यारे,दारू घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. बुधवारी रात्री शेंडा पार्क परिसरात दोघा तरुणांना अटक करून त्यांच्याकडून एक तलवार व कोयता अशी हत्यारे जप्त केली.

धीरज यशवंत गायकवाड (वय २२ सध्या रा.कळंबा, ता. करवीर, कोल्हापूर, मुळ टिक्केवाडी ता. भुदरगड) व शुभम शिवाजी पाटील (वय २२ रा.कावणे, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या आदेशानुसार(walking treadmill) गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, सहायक फौजदार समीर शेख, संदीप सावंत, युक्ती ठोंबरे हे शेंडा पार्क परिसरात बुधवारी रात्री गस्त घालत होते.

यावेळी फिरताना वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुण मिळाले, त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे पोलीसांनी त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे तलवार व कोेयता अशी हत्यारे मिळाली. पहाटे चार वाजता त्यांना अटक करण्यात आली आहे.

घातक व धारदार हत्यारे जवळ बाळगल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चव्हाण व प्रविण आवडे तपास करीत आहेत.

हेही वाचा :

साठ वर्षापूर्वीच्या जखमेची मंडलिकानी, खपली का काढली?

‘आमचं ठरलंय’नं पलटवली बाजी अन् बंटी पाटलांनी स्वतःच्या पराभवाचा काढला वचपा

हातकणंगलेत जयंत पाटलांचा नवा डाव.. थेट शिंदे समर्थक आमदाराची घेतली भेट; धैर्यशील मानेंच्या अडचणी वाढणार?