Jr NTR ‘वॉर २’च्या शूटिंगसाठी मुंबईत दाखल, हृतिक रोशनसोबत करणार ॲक्शन सीन्स

यशराज फिल्म्स स्टुडिओजच्या स्पाय युनिव्हर्स चित्रपटांमध्ये अनेक बॉलिवूड(film industry) चित्रपटांचा समावेश होतो. ‘एक था टायगर’, ‘टायगर झिंदा है’, ‘वॉर’, ‘पठान’ आणि ‘टायगर ३’ नंतर ‘वॉर २’. ‘वॉर २’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

मोस्ट अवेटेड चित्रपटांमध्ये ‘वॉर २’ चित्रपटाचा(film industry) समावेश झाला आहे. नुकतीच चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झालेली आहे. ‘वॉर २’साठी ज्युनियर एनटीआर गुरूवारी मुंबईत पोहोचला आहे. शुक्रवारपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अभिनेता मुंबईमध्ये दाखल होताच तो मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

निळा शर्ट, टोपी आणि ब्लॅक गॉगल असा अभिनेत्याचा काल लूक पाहायला मिळाला. अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी मुंबईत दाखल होताच तो पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. ‘वॉर २’चे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे.

ज्युनियर एनटीआरसोबत चित्रपटासाठी हृतिक रोशनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन या दोघांचाही लवकरच ॲक्शन सीन शूट होणार आहे. ‘वॉर २’ मध्ये कियारा अडवाणी ही मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ पुढच्या वर्षी १४ ऑगस्टला रिलीज होण्याची शक्यता आहे.

‘वॉर २’ या चित्रपटाच्या माध्यमातून ज्युनियर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘वॉर २’ हा एनटीआरचा पहिला हिंदी चित्रपट असेल. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ज्युनियर एनटीआर एका महत्त्वाच्या सीक्वेन्सच्या शूटिंगसाठी जवळपास १० दिवस मुंबईत असेल. गेल्या अनेक दिवसांपासून हृतिक रोशन ‘वॉर २’ चित्रपटाची शूटिंग करीत आहे.

एनटीआर आणि हृतिक या दोघांचाही एक महत्वाचा ॲक्शन सीन शूट करण्यात येणार आहे. ज्यु. एनटीआर चित्रपटामध्ये एका निगेटिव्ह रोलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. ज्युनियर एनटीआर यापूर्वी कधीही त्या रोलमध्ये दिसला नव्हता. चित्रपटाचा ज्यु. एनटीआरच्या लूकबद्दल चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

हेही वाचा :

साठ वर्षापूर्वीच्या जखमेची मंडलिकानी, खपली का काढली?

कोल्हापुरात तलवार कोयता घेऊन फिरणाऱ्यांना अटक

हातकणंगलेत जयंत पाटलांचा नवा डाव.. थेट शिंदे समर्थक आमदाराची घेतली भेट; धैर्यशील मानेंच्या अडचणी वाढणार?