कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ८ दिवसांत विविध ठिकाणी जोरदार वादळी पावसाने झोडपले (rain). दरम्यान पुढचे काही दिवस पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता जिल्ह्यातील काही भागात हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, काल (दि.१२) रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १६.५ मि.मी. पाऊस (rain) झाला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याला वळवाचा तडाखा बसत आहे. दरम्यान पुढचे ३ आणखी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१६ तारखेनंतर वातावरणात थोडा बदल होण्याची शक्यता आहे. शनिवारी तसेच रविवारी जोरदार पाऊस झाला.उद्यापासून सकाळी हवेत उष्मा राहील, दुपारनंतर मात्र जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. आज (दि. १३) जिल्ह्याच्या काही भागांत अतिवृष्टी होईल, असाही अंदाज आहे.
हेही वाचा :
CAA कायद्या मुळे पहिल्यांदाच 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व
मुंबईत महायुतीचं ‘शक्ती’ प्रदर्शन, मोदींचा ‘रोड शो’
शांतोकडेच बांगलादेशचे नेतृत्व, टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर